शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
3
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
4
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
5
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
6
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
7
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
8
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
9
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
10
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
11
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
12
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
13
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
14
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
15
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
16
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
17
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
18
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
19
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
20
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 

एकीकडे दुरुस्ती तर दुसरीकडे लगेच नवीन भगदाड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 18:04 IST

वाई : बारा महिने, चोवीस तास पर्यटकांच्या वर्दळीने फुललेला पसरणी घाट सध्या निसर्ग अन मानवाचा संघर्ष पाहण्यातच जणू दंग झाला आहे. पावसाळा सुरु झाल्यानंतर रस्त्यालगतचे उध्वस्त कठडे बांधण्यासाठी एकीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने कंबर कसली असली तरी दुसरीकडे लगेच नवे भगदाड निर्माण करण्यात निसर्गाची स्पर्धा सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. वाई-पाचगणी रस्त्यावर घाटात १६ नंबरजवळ मुख्य रस्त्याला पडलेल्या भगदाडाची सार्वजनिक बांधकाम विभागाने दुरुस्ती करण्याचे काम हाती घेतले आहे.

ठळक मुद्देबांधकाम विभागाची कसरत पसरणी घाटात निसर्गासोबत आगळीच स्पर्धा

वाई : बारा महिने, चोवीस तास पर्यटकांच्या वर्दळीने फुललेला पसरणी घाट सध्या निसर्ग अन मानवाचा संघर्ष पाहण्यातच जणू दंग झाला आहे. पावसाळा सुरु झाल्यानंतर रस्त्यालगतचे उध्वस्त कठडे बांधण्यासाठी एकीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने कंबर कसली असली तरी दुसरीकडे लगेच नवे भगदाड निर्माण करण्यात निसर्गाची स्पर्धा सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे.वाई-पाचगणी रस्त्यावर घाटात १६ नंबरजवळ मुख्य रस्त्याला पडलेल्या भगदाडाची सार्वजनिक बांधकाम विभागाने दुरुस्ती करण्याचे काम हाती घेतले आहे.

 वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत होता. त्यातच पसरणी घाटात धुक्यासह पाऊस पडत असल्याने या रस्त्यावरून प्रवास करणे अवघड झाले होते. आठ-ते दहा फुटांचा रस्ता पावसात वाहून गेला होता. वाईचे बांधकाम विभागाने या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेतल्याने प्रवशांमध्ये समाधान आहे.

 पाच ते दहा फूट रस्ता खचला होता. बुवासाहेब मंदिराच्या शेजारीही मोठी दरड कोसळण्याची शक्यता असल्याने बांधकाम विभागाने हे काम हाती घेतले. पाण्याने दगडी रिकाम्या होऊन दरड कोसळण्याच्या बेतात होते. पसरणी घाटातील हे मंदिर या रस्त्यावरून जाणाºया वाहनचालक व लोकांचे श्रद्धास्थान आहे.

मंदिराच्या बाजूने पाण्याचे लोट लागले होते. वाईतून पाचगणीला जाण्यासाठी हाच एकमेव रस्ता असल्याने तसेच या घाटात वाहतूक नेहमीच प्रचंड प्रमाणात असते. मोठ्या प्रमाणात पाऊस पडला असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाला कसरत करतच काम करावे लागत आहे.