शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

एकीकडे म्हणे जलजागृती; दुसरीकडे मात्र डुलकी!

By admin | Updated: April 5, 2016 00:56 IST

सामाजिक कार्यकर्त्याकडून भांडाफोड : धोम पाटबंधारे विभागातील लिपिकाच्या ‘वामकुक्षी’चे बिनधास्त चित्रीकरण

सातारा : धोम धरणात केवळ १६.३४ टक्के पाणीसाठा उरला आहे. या धरणावर लाभार्थी असणारे शेतकरी पाणी-पाणी करून त्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. एका बाजूला शासन ‘जलजागृती’ सप्ताह राबवून पाणी बचतीचे संदेश देत आहे, याचवेळी धोम पाटबंधारे कार्यालयातील लिपिक मात्र कामावर येताच दिवसा-ढवळ्या डुलक्या घेत असल्याचे उघडकीस आले आहे. या कर्मचाऱ्याच्या डुलक्या एका सामाजिक कार्यकर्त्याने ‘आॅन द स्पॉट’ कॅमेराबद्ध केल्या. सातारा तालुक्यातील जावळवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते राजू शेळके व त्यांचे सहकारी मित्र संजय कांबळे हे सोमवारी पाणी परवान्यासाठी शेतकऱ्यांना होत असलेल्या त्रासाबाबत धोम पाटबंधारे विभागात गेले होते. दुपारी साडेबाराची वेळ... त्याचवेळी हे दोघे कार्यालयात गेले. तेव्हा धोम पाटबंधारे विभागाचे प्रथम लिपिक पी. डी. सावंत हे आपल्या खुर्चीत बसून डुलक्या घेत होते. शेळके यांनी ा खुर्चीवर डुलक्या खातानाचे चित्रीकरणही तब्बल काही मिनिटे केले. काही वेळाने कार्यालयातील एका शिपायाने सावंतांची वामकुक्षी मोडली. डोळे उघडल्यानंतर आपण कॅमेराबद्ध झाल्याचे पाहून सावंत यांनी तिथून पळ काढला. अर्धी रजा टाकून ते कार्यालयातून गायब झाल्याचीही चर्चा कार्यालयात नंतर सुरू झाली. शासनाचा पगार... शासनाचे कार्यालय... शासनाचा टेबल... शासनाची खुर्ची; पण शासनाचं म्हणजे पर्यायानं लोकांचं काम करायचं नाही, त्यांना तंगवत ठेवायचं, लोकांना हेलपाटे मारायला लावायचं, या कलेत तरबेज असणारी ही शासकीय प्रवृत्ती कार्यालयात आल्यानंतर किती मुजोरपणे वागत असते, याचे हे जाहीर उदाहरण ठरले आहे. पावसाने तोंड फिरवले, धरणांत पाणी नाही, भेगाळलेल्या जमिनीकडे ओल्या डोळ्यांनी पाहावे लागत आहे, अशा परिस्थितीत मेटाकुटीला आलेले शेतकरी सावंतांसारख्या प्रवृत्तीमुळे आणखी पिचले जात आहेत, अशी नाराजी शेळके यांनी व्यक्त केली. शेळके म्हणाले, ‘धोम कार्यालयातील शेती पाणीउपसा परवाना देण्याचे काम जिल्हास्तरावरून दिले असताना शेतकऱ्यांना केवळ नाहक त्रास देण्याचे व यातून गैरलाभ उठविण्याच्या हेतूने पुणे कार्यालयातून परवाना मिळेल, असा फतवा काढण्यात आला होता. पुणे कार्यालयाकडून याबाबत स्पष्ट आदेश दिले गेले, त्याची प्रत आणण्यासाठी कार्यालयात गेलो असता शासकीय इतमामात संबंधित लिपिकाच्या डुलक्या सुरू होत्या.’