शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
2
Pahalgam Terror Attack : 'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
3
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
4
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
5
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
6
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
7
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
8
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
9
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
10
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
11
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
12
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
13
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
14
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
15
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
16
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
17
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
18
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
19
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
20
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार

एक पोरकट तर दुसरा लुच्चा!

By admin | Updated: June 17, 2015 22:05 IST

इंद्रजित मोहितेंची सडेतोड मुलाखत : विरोधकांनी करून ठेवलेली कर्जे अन् देण्यांचा नेमका आकडा निवडणुकीनंतरच स्पष्ट होईल-- लोकमत- सडेतोड

कऱ्हाड : शेतकऱ्यांच्या मालकीची सहकारी साखर कारखानदारी टिकणार की नाही, हा गहन प्रश्न हाताळणारी ही निवडणूक असताना, निवडणुकीला गांभीर्याने सामोरे न जाता आमचा एक विरोधक पोरकटपणे व्यक्तिगत आरोप करीत आहे तर दुसरा विरोधक सहकारातून ‘खासगी’ प्रगती साधल्यानंतर कारखान्याविषयी खोटा कळवळा दाखवून लुच्चेपणाने पुन्हा सहकाराकडे वळला आहे, अशा सडेतोड भाषेत यशवंतराव मोहिते रयत पॅनेलचे प्रमुख इंद्रजित मोहिते यांनी विरोधकांची हजेरी घेतली.यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची तिरंगी निवडणूक भलतीच गाजत असताना ‘लोकमत’ तीनही पॅनेलप्रमुखांच्या भूमिका जाणून घेत आहे. रेठरे बुद्रुकमध्ये संध्याकाळच्या सभेची जोरदार तयारी सुरू असतानाच ‘लोकमत टीम’ इंद्रजित मोहिते यांच्या घरी पोहोचली तेव्हा ‘कृष्णे’च्या सद्य:स्थितीसह एकूणच सहकारी साखर कारखानदारीबद्दल मोहिते यांनी रोखठोक मते मांडली. आपली लोकप्रियता कमी झाल्याचे मागील निवडणुकीच्या पराभवावरून त्यांना दिसून आले आणि त्यांनी त्याची कठोर कारणमीमांसाही केली. ‘कारखान्याच्या उन्नतीसाठी काही बदल करताना सभासदांना विश्वासात घ्यायला हवे होते,’ असे सांगून ते म्हणाले, ‘केवळ साखर कारखानदारीचे ज्ञान पुरेसे नसून, निवडणुकीला राजकीय अंगही असते. सभासदांना सतत संपर्काची अपेक्षा असते. त्यात आम्ही कमी पडलो. कारखान्यासाठी केलेली खरेदी राज्यस्तरीय समितीच्या माध्यमातून होते. मात्र, ती आम्ही स्वत: करून ‘लाभ’ मिळविला, अशी अफवा विरोधकांनी पसरविली होती. आमची बाजू खरी असूनही गैरप्रचार करण्यात विरोधकांना यश आले. त्यामुळेच यावेळी आम्ही सावध आहोत.’गेल्या पाच वर्षांत विरोधकांची ‘कार्यकुशलता’ सभासदांना चांगलीच समजली असल्याचे सांगून मोहिते म्हणाले, ‘आमच्या कार्यकाळात सुरू झालेल्या चार-पाच प्रकल्पांचे श्रेय आज ते घेतात. मद्यार्कनिर्मिती प्रकल्पाचे आधुनिकीकरण करून आम्ही एक लाख लिटरने क्षमता वाढवून ठेवली होती. तसेच २१० दिवस हा प्रकल्प चालविण्याची परवानगी मिळविली होती. परंतु अविनाश मोहितेंच्या कार्यकाळात त्या मानाने उत्पादनवाढ झाली नाही. जे उत्पादन वाढले त्याचा परिणाम ऊसदरावर दिसला नाही. चुका झाकण्यासाठी विरोधक व्यक्तिगत आरोपांवर उतरले असले तरी आमचा ‘फोकस’ आरोपांपेक्षा कारखानदारीवरच अधिक असून, भाषणात आम्ही सद्य:स्थितीचे विश्लेषण करीत आहोत.’ (लोकमत चमू)‘वसंतदादा’पेक्षा कर्जभार अधिक सांगलीच्या वसंतदादा पाटील साखर कारखान्यापेक्षाही कर्जाचा अधिक भार आज ‘कृष्णे’वर आहे, असे नमूद करून इंद्रजित मोहिते म्हणाले, ‘आम्ही सत्ता सोडली तेव्हा २१० कोटींचे कर्ज होते. नव्या प्रकल्पांच्या उभारणीस ७० ते ७५ कोटी रुपये खर्च आला होता. मालतारण कर्ज आज २३० कोटींवर पोहोचले असून, कारखाना तारण ठेवून ३१७ कोटींचे कर्ज काढण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर भाग कार्यालयांवरही ४३ कोटींचे कर्ज आहे. पुरवठादारांची देणी थकली आहेत. निवृत्त कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीचे ४५० कोटी देणे आहे. ऊसतोडीसह अनेक देणी बाकी आहेत.’तरीही ‘आई’ला वाचविणारचकारखान्याची परिस्थिती दयनीय असतानाही तुम्हाला सत्ता का हवी आहे, या विरोधकांच्या सवालाची आठवण करून दिली असता मोहिते भावूक झाले. ‘कारखाना माझी आई आहे. माझे वडील उभारणीत होते. कारखान्याच्या अंगणात मी खेळलो-वाढलो. १५ वर्षे मदनरावांच्या साथीने मी कारखाना चालवला आहे. चांगला ऊसदर देण्याची किमया साध्य करून दाखवली आहे. आई आजारी पडली तर तिला कुणी वाऱ्यावर सोडून देत नाही. कारखाना वाचविण्याचा प्रयत्न मी करणारच. कारखाना जगावा आणि तो सभासदांच्याच मालकीचा राहावा, हीच माझी भूमिका आहे,’ असे ते म्हणाले.कृषी महाविद्यालयाविषयी अनाठायी टीकासभासदांच्या मालकीच्या सर्वच सहकारी कारखान्यांचे अस्तित्वच पणाला लागलेले असताना कारखानदारांनी नैतिकतेत कमी पडता कामा नये. म्हणूनच आम्ही अल्प, मध्यम आणि दीर्घकालीन नियोजन केले आहे. टीकेचा सूर न लावता हेच मुद्दे प्रचारात मांडत आहोत, असे सांगताना विरोधकांनी कृषी महाविद्यालयाविषयी केलेल्या आरोपांना मोहिते यांनी उत्तर दिले. ‘आमच्या आधीच्या अध्यक्षांनीच या महाविद्यालयाला मान्यता आणली. परंतु कारखान्याच्या ध्येयधोरणांमध्ये ‘शिक्षण’ या उद्दिष्टाचा उल्लेख कुठेच नाही. पुढे तांत्रिक अडचणी येऊ नयेत म्हणून अयुक्तांना विचारून त्यांच्याच सल्ल्याने आम्ही ट्रस्ट स्थापन केला. कारखान्याचा अध्यक्षच ट्रस्टचा विश्वस्त राहील अशी तरतूद केली. महाविद्यालयासाठी किमान शंभर एकर जमीन लागते. त्यामुळे ट्रस्ट आणि कारखान्यादरम्यान सहमती करार करून १५६ एकर जमीन कृषी महाविद्यालयाकडे वर्ग केली,’ असे त्यांनी सांगितले.सत्ताबाह्य केंद्रे : कऱ्हाडात अन् वाळव्यातअविनाश मोहिते यांच्या कार्यकाळात ‘सत्ताबाह्य केंद्र’ कार्यरत असल्याचा आरोप केला जातो. त्याविषयी मोहिते म्हणाले, ‘अशी दोन सत्ताबाह्य केंद्रे आहेत. एक कऱ्हाड तर तुसरे वाळवा तालुक्यात. त्यामुळे कारखान्याची आणखी पीछेहाट झाली. प्रदूषण ही व्यवस्थापनाची चूक; पण दंडाचा बोजा पडला सभासदांवर. भांडवली ठेवी वर्ग केल्या नाहीत, असे ते आज म्हणतात; पण तसा ठराव केला आहे, त्याचे काय? आमचे दुसरे विरोधक कारखान्याचे दुसरे युनिट काढायचे म्हणतात. पण ‘जयवंत शुगर’ हेच ते युनिट. त्यांची सगळी युनिट आणि ट्रस्ट कृष्णा कारखान्यातून मिळालेल्या लाभावरच आधारित आहेत.’आरोप करणे सोपे आहेविरोधक आपल्या ट्रस्टविषयीही आरोप करतात, हे निदर्शनास आणून देताच मोहिते म्हणाले, ‘आरोप करणे सोपे असते. आईच्या निधनानंतर तिच्या नावाने मी ट्रस्ट सुरू केला आणि इंग्रजी माध्यमाची शाळा पत्र्याच्या शेडमध्ये काढली. आजही ती त्याच शेडमध्ये आहे. कारखान्यातील लाभावर ट्रस्ट काढला असता तर टोलेजंग इमारत बांधली नसती का? कृषी महाविद्यालय हा हडप केलेला ट्रस्ट आहे असे विरोधक म्हणतात, तर त्यांनी त्याची ‘रिटर्न्स’ का भरली? पाच वर्षांत आमच्यावर कारवाई का नाही केली? खोटे बोलून काही दिवस लाभ होतो; मात्र सभासदांनी सर्वांच्याच क्षमता आता ओळखल्या आहेत.’