शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

गुप्तीने मारहाण केल्याप्रकरणी एकाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:42 IST

फलटण : सरडे, ता. फलटण येथे पत्नीला त्रास का देतो ? असे विचारीत दोघांना गंभीर जखमी करून जिवे ...

फलटण : सरडे, ता. फलटण येथे पत्नीला त्रास का देतो ? असे विचारीत दोघांना गंभीर जखमी करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एकाजणास ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे.

तात्याबा विठ्ठल पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, रविवार, दि. २५ रोजी सायंकाळी सातच्या सुमारास सरडे, ता. फलटण हद्दीत त्यांच्या शेताचे लगत असणाऱ्या रस्त्यावर सुनील सदाशिव मोरे (रा. खामगाव, ता. फलटण) हा त्याचे चारचाकी गाडी क्रमांक (एमएच ११ बीव्ही ३६१७) मधून येऊन मुलगा चंद्रकांत यास ‘तू माझी पत्नी प्रज्ञा हिला त्रास का देतो,’ असे म्हणत गुप्तीसारख्या हत्याराने जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने चंद्रकांत याचे पोटात गुप्ती मारून गंभीर दुखापत केली. दुसरा मुलगा सूर्यकांत हा भांडणे सोडविण्यास गेला असता त्याचेही डाव्या काखेत गुप्ती मारून गंभीर केले. त्या दोघांचा खून करण्याचा प्रयत्न केला आहे.

याप्रकरणी सुनील सदाशिव मोरे (रा. खामगाव, ता. फलटण) यांच्या विरोधात फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून, पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक संजय बोंबले तपास करत आहेत.