शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

दीड वर्षाच्या चिमुकल्याचा ट्रॅक्टरखाली सापडून मृत्यू

By admin | Updated: April 10, 2016 00:10 IST

उत्तर कोपर्डेतील घटना : अनावधानाने क्लचवर पडला पाय

कोपर्डे हवेली : अनावधानाने क्लचवर पाय पडल्यामुळे टायरनजीक खेळणारा दीड वर्षांचा चिमुकला ट्रॅक्टरखाली सापडून ठार झाला. उत्तर कोपर्डे, ता. कऱ्हाड ग्रामपंचायतीलगत शुक्रवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सोहम सुनील देवकर असे त्या चिमुरड्याचे नाव आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर कोपर्डे येथे सुनील देवकर हे वडील माणिक, पत्नी राणी, दोन मुली व सोहम यांच्यासमवेत राहतात. ग्रामपंचायतीलगतच देवकर कुटुंबीयांचे घर आहे. सुनील यांचा ट्रॅक्टर (एम. एच. २३ टी. ७२८) असून ते त्याद्वारे ऊस वाहतुकीचे काम करतात. ट्रॅक्टरसाठी ऊसतोडणी करणारी मजुरांची टोळीही ग्रामपंचायतीपासून काही अंतरावर वास्तव्यास आहे. शुक्रवारी पाडव्याचा सण असल्याने ऊसतोडणीला सुटी होती. सर्व मजूर त्यांच्या झोपड्यांमध्येच होते, तर सुनील यांनीही त्यांचा ट्रॅक्टर घरानजीक उतारावर उभा केला होता. रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास सुनील हे ट्रक्टरमध्ये मित्रांसह गप्पा मारत बसले होते. ट्रॅक्टरच्या स्वीचला लावलेली चावी तशीच होती. ट्रॅक्टरशेजारी सुनील यांचे वडील माणिक, पत्नी राणी हे दोघेजण थांबले होते, तर दीड वर्षांचा सोहम ट्रॅक्टरच्या टायरनजीक खेळत होता. त्याचवेळी अचानक कोणाचा तरी पाय ट्रॅक्टरच्या क्लचवर पडला. उतार असल्याने ट्रॅक्टर लगेच पुढे सरकला. त्याचवेळी अचानक ट्रॅक्टरचा स्टार्टर सुरू झाल्याने ट्रॅक्टर काही अंतर तसाच पुढे गेला. हा प्रकार निदर्शनास येताच राणी यांनी सोहमला टायरजवळून लांब खेचण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत ट्रॅक्टरचा टायर पायावरून गेल्याने तसेच इतर दुखापत झाल्याने सोहम जखमी झाला. यावेळी मायलेकरांच्या किंकाळ्यांनी सर्व परिसर शहारला. ग्रामस्थ व नातेवाइकांनी सोहमला तातडीने कऱ्हाडच्या कृष्णा रूग्णालयात दाखल केले. अति रडण्याने व घाबरल्याने सोहमला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. मात्र, प्रकृती खालावत गेल्याने शनिवारी सकाळी सोहमचा मृत्यू झाला. (वार्ताहर)