शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
6
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
7
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
8
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
9
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
10
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
11
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
12
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
13
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
14
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
15
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
16
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
17
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
18
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
19
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
20
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

बेदरकार चालकाने हिरावले वृद्ध आईवडिलांचे ‘तारुण्य’

By admin | Updated: December 2, 2014 23:27 IST

मणके, गुडघे दुखावले : आधुनिक ‘श्रावणबाळा’ची भरपाईसाठी थेट पोलीस अधीक्षकांकडे धाव

पुसेगाव : फलटण आगाराच्या चालकाने बेजबाबदारपणे एसटी चालवल्याने प्रवासादरम्यान वयोवृध्द आई-वडिलांच्या झालेल्या गंभीर दुखापतीबाबत न्याय मिळावा; तसेच त्यांच्यावर झालेल्या औषधोपचाराचा खर्च मिळावा, अशी मागणी डिस्कळ येथील दीपक सूर्यभान कर्णे यांनी केली आहे. फलटण आगार व्यवस्थापक व जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे याबाबत निवेदन देण्यात आले आहे.निवेदनात म्हटले आहे की, दि.२२ नोव्हेंबर रोजी फलटण आगाराच्या फलटण-वडूज या एसटीमधून सकाळी आई सुलोचना कर्णे (वय६५, रा. डिस्कळ) या आजारी असल्याने वडील सूर्यभान कर्णे (वय ७५) त्यांना घेऊन पुसेगावला दवाखान्यात निघाले होते. गाडीत गर्दी होती म्हणून या वृध्द दाम्पत्याला पाठीमागील सीटवर बसावे लागले. डिस्कळ-पुसेगाव रस्ता जागोजागी खराब असल्याने एसटीचालकाने गाडी जबाबदारीने चालवणे गरजेचे होते. वाहक तिकीट काढण्यासाठी जवळ आल्याने सूर्यभान कर्णे खिशातून ज्येष्ठ नागरिक पास व पैसे काढू लागले. तेवढ्यात मोठ्या खड्ड्यात गाडी जोरात आपटल्याने वडील जोरात उडून त्यांचे डोके एसटीच्या वरील जाळीला धडकले आणि ते खाली पडले. त्यांच्या पाठीच्या मणक्यांना व मानेला जोरात झटका बसला व ते चक्कर येऊन कोसळले. आईच्या गुडघ्याला गंभीर इजा झाली. पती चक्कर येऊन पडल्याचे पाहून व गुडघ्याला लागलेला मार सहन न झाल्याने सुलोचना यांनी हंबरडा फोडला. प्रवाशानी आरडाओरडा केल्याने चालकाने बस थांबवली. गावातील लोकांनी ही माहिती या दाम्पत्याच्या मुलांना दिली. त्यांनी तातडीने त्यांना रूग्णालयात नेले. (वार्ताहर)उतारवयातही कुटुंबप्रमुख म्हणून आमचे वडील सर्व जबाबदाऱ्या सक्षमपणे पेलत होते. त्यांना कोणताही आजार नव्हता; मात्र एसटीचालकाच्या बेजबाबदारपणामुळे, तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या राखीव जागा मिळवून देण्याबाबत वाहकाने केलेल्या दुर्लक्षामुळे आमच्या वयोवृध्द आई-वडिलांना मोठा त्रास सोसावा लागत आहे. त्यांना न्याय मिळालाच पाहिजे.- संतोष सूर्यभान कर्णे, डिस्कळखड्ड्यानंतरचा मोठ्ठा ‘खड्डा’दि. २२ ते २७ या काळात या दाम्पत्यावर उपचार सुरू होते. सुमारे ४० हजार रूपये खर्च होऊनही आजारपणात वाढच झाली, असे संतोष यांचे म्हणणे आहे.सूर्यभान यांची उजवी बाजू आज ५० टक्केच कार्यरत आहे. ते स्वत:च्या हाताने जेवू शकत नाहीत. पायावर भार पडल्यास चालताही येत नाही.आई या प्रसंगाने कमालीची भेदरली आहे. फलटण आगाराचे चालक-वाहक व आगारप्रमुखांनी साधी विचारपूसही केली नाही.रुग्णालयाच्या खर्चाची एसटीकडून भरपाई मिळावी व चालक-वाहकांना सूचना द्याव्यात, अशी मागणी दीपक यांनी केली आहे.