शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

प्रचाराला पदाधिकाऱ्यांची फौज

By admin | Updated: October 9, 2014 23:02 IST

आपापले भाग सांभाळणार : नेत्यांच्या खेळीमुळे लागलेल्या लॉटरीला आली जागण्याची वेळ

जगदीश कोष्टी - सातारा -ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांसह सभापती निवडीत सदस्यांनी नेत्यांना खिंडित पकडण्याचा प्रयत्न केला अन् त्यातून अनेकांना पदांची लॉटरीही लागली. या लॉटरीला जागण्याची वेळ आता आली असून, आपापले भाग सांभाळण्यासाठी जिल्हा परिषदेचे पदाधिकारी प्रचाराला लागले आहेत.जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी गेल्या महिन्यात निवडी झाल्या. त्यावेळी अनेकजण इच्छुक होते. त्यातील काहींनी दबावही आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून बेरजेचे राजकारण केले. त्यातून आपल्या मतदारसंघासाठी अडचणीचा ठरणार नाही, याचा विचार करून फलटणला माणिकराव सोनवलकर यांच्या रूपाने जिल्हा परिषद अध्यक्ष तर साताऱ्याला रवी साळुंखे यांच्या रूपाने उपाध्यक्षपद मिळाले.त्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीतील आघाडीत बिघाडी झाली अन् सभापती निवडीत नाराज झालेल्या विधानसभा मतदारसंघांना प्रतिनिधीत्व देत माण-खटावला झुकते माप दिले. हे करत असताना जिल्हा परिषद सदस्य जेवढे आक्रमक होते, त्याहीपेक्षा नेत्यांच्या डोक्यात वेगळीच गणितं होती. त्यामुळे सभापतिपदाची लॉटरी लागली आहे. नेत्यांच्या आशीर्वादामुळे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सभापतिपद मिळाल्याने या लॉटरीला जागण्याची वेळ आली आहे. आपल्याला वरदहस्त असलेला नेता आमदार झाला तर आपला जिल्हा परिषद गट तसेच परिसराचा विकास करण्यासाठी निधी आणणे सोपे जाणार आहे. तसेच आता त्यांचा प्रचार केला तर भविष्यात हक्काने कामे करुन घेता येणार आहे. विधानसभा निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात आला आहे. त्यामुळे आपापल्या भागात प्रचार करण्यामध्ये हे पदाधिकारी गुंतले आहेत. सभापतिपदाच्या निवडी दि. २ आॅक्टोबरला झाल्या. बहुतेकजण तेव्हापासून जिल्हा परिषदेत आलेलेच नाहीत. आचारसंहिता लागू असल्याने जिल्हा परिषदेत फारशी कामेही करता येत नाहीत. तसेच अधिकारी, कर्मचारी निवडणूक कामात असल्याने ही मंडळी आता निवडणूक झाल्यानंतरच येणार आहेत. कक्षांना कड्यासातारा जिल्हा परिषदेत अध्यक्ष, उपाध्यक्ष, विषय समित्यांच्या सभापतींच्या कक्षांना कड्या लावलेल्या पाहायला मिळत आहेत. त्यांना भेटण्यासाठी येणाऱ्यांना सेवक मंडळी, ‘साहेब आज आले नाहीत,’ असे सांगत आहेत.जिल्हा परिषदेच्या पदाधिकारीची संधी मिळालेले सहाही जण प्रचाराला लागले आहोत. हे करत असताना आपापले गट पाहून सामाजिक परिस्थितीनुसार प्रचार करणार आहे.- माणिकराव सोनवलकर,अध्यक्ष, जिल्हा परिषद सातारा. विधानसभा निवडणुकीत प्रचारासाठी ठराविक असा भाग वाटून घेतला नसून, जेथे गरज असेल त्या ठिकाणी प्रचाराला जात आहे. - रवी साळुंखे, उपाध्यक्ष, जिल्हा परिषद