शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

‘आतल्या अन् बाहेरच्या’ अपक्षांमुळे अधिकृत उमेदवार गोंधळात..

By admin | Updated: April 8, 2016 23:57 IST

अपक्षांची संख्या जास्त असल्याने मोठी मतविभागणी होणार आहे. याचा फायदा काँग्रेसला का राष्ट्रवादीला मिळणार याबाबत कयास

दशरथ ननावरे - लोणंद --लोणंद नगरपंचायतीच्या निवडणुकीत १७ प्रभागांमध्ये २० अपक्ष उमेदवारांनी दंड थोपटून रंगत आणली आहे. अपक्षांनी छुप्या प्रचाराचा गनिमी कावा आखत प्रमुख पक्षांना अडचणी निर्माण केल्या आहेत. काही अपक्ष उमेदवार आपल्याला पक्षातीलच काही लोकांचा अंतर्गत पाठिंबा असल्याचे छातीठोकपणे सांगू लागल्याने ‘आतले आणि बाहेरचे’ चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. प्रभाग क्र. १ मधून प्रबळ दावेदार समजल्या जाणाऱ्या शिवाजीराव शेळके यांनी राष्ट्रवादीच्या हणमंत शेळके यांना आव्हान दिले आहे. मात्र शिवाजीराव शेळके यांना मतांची रसद मिळू नये, यासाठी शंकर क्षीरसागर यांचीही अपक्ष उमेदवारी ठेवण्यामागे राष्ट्रवादीचाच हात असल्याची चर्चा आहे. प्रभाग २ मध्ये राष्ट्रवादीला उमेदवार नसल्याने येथे अपक्ष विठ्ठल साळुंखे यांना साथ देण्याचा निर्णय घेणार का? अशी चर्चा आहे.प्रभाग ३ मध्ये अपक्षांची संख्या जास्त असल्याने मोठी मतविभागणी होणार आहे. याचा फायदा काँग्रेसला का राष्ट्रवादीला मिळणार याबाबत कयास लावले जात आहेत. कारण राष्ट्रवादीच्या सचिन शेळके यांनी ऐनवेळी रिंगणात लढण्याचा घेतलेला निर्णाय कशासाठी याचा तर्कवितर्क लावला जातोय. प्रभाग ४ मध्ये राष्ट्रवादीचा अर्ज बाद झाल्याने येथील अपक्ष उमेदवार मंगल कांबळे यांनी हातात पतंग घेऊन मनगटावर घड्याळ बांधल्याने मोठी चुरस वाढली आहे. प्रभाग १२ हा काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जाणारा मतदारसंघ आहे. मात्र काँग्रेसकडून बंडखोरी करत शाहीन बबलू इनामदार यांनी अपक्ष रणांगणात उतरल्याने मोठे आव्हान ठरले आहे. येथे अंतर्गत हालचालींवर राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाची बारकाईने नजर आहे.प्रभाग १३ मध्ये राष्ट्रवादीचे नेते आंनदराव शेळके-पाटील व काँग्रेसचे पुरुषोत्तम हिंगमिरे यांच्यात काट्याची टक्कर आहे. प्रभाग १४ मध्ये राष्ट्रवादीला अपक्ष उमेदवारालाच साथ द्यावी लागते आहे. अपक्ष योगेश परदेशी यांच्या खांद्यावर राष्ट्रवादीने मदार सोपविली आहे. प्रभाग १५ मध्ये लोणंदच्या सत्ताकारणात महत्त्वाची भूमिका बजावणारे गणीभाई कच्छी यांनी आपल्या पत्नीचा अपक्ष अर्ज ठेवल्याने येथे रंगत वाढली आहे. तर प्रभाग १६ मध्ये काँग्रेसचे सर्वेसर्वा बाळासाहेब बागवान यांची राष्ट्रवादीच्या योगेश क्षीरसागर यांच्याशी लढत होणार असून, भाजप शिवसेनेनेही येथे शक्ती लावली आहे.निवडणुकीत अपक्षांनी धुरळा उडविल्याने पक्षीय राजकारणाची गणिते बदलली गेली आहेत. अगोदर नगरसेवक नंतर पक्षाची निष्ठा असाच विचार करून अनेकांनी रणशिंग फुंकल्याने मोठी चुरस वाढली आहे. मात्र, यात नक्की बाजी कोण मारणार, हे मतदारराजाच ठरवणार आहे. अपक्षांचे आव्हान मोडीत काढण्याचे प्रयत्नवास्तविक अर्ज माघारीसाठी रात्रीच्या अंधारात प्रकट झालेले उमेदवार अर्ज माघार घेतो, असे सांगून दिवसा उजेडी गायब झाल्याने अनेकांचे धाबे दणाणले होते; परंतु गेला तो आपला नव्हताच, अशी भूमिका घेत पक्षप्रमुखांनी पार्टीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी एकवटण्याचे आव्हान केले. प्रचार करण्याबरोबरच अपक्षांचे आव्हान मोडीत काढण्यासाठीच प्रमुख पक्षांची शक्ती खर्ची पडत आहे.