शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य केंद्राला अधिकाऱ्याचे वावडे

By admin | Updated: July 27, 2015 00:18 IST

खटावमधील स्थिती : वैद्यकीय सेवेअभावी रुग्णांची खासगी रुग्णालयांकडे धाव

खटाव : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कायमस्वरूपी आरोग्य अधिकारी नसल्याने रुग्णांनी मोठी परवड होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही परिस्थिती जैसे थे असल्याने आता रुग्णांनीच आरोग्य केंद्राकडे पाठ फिरवली आहे. हे आरोग्य केंद्र म्हणजे ‘असून अडचण नसून खोळंबा’ अशी स्थिती निर्माण झाली आहे.खटावमधील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांची गरज असताना याठिकाणी केवळ एकच वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. अनेकदा उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची वैद्यकीय अधिकाऱ्याविना गैरसोय होते. त्यामुळे रुग्णांनी प्राथमिक आरोग्य केंद्राकडे पाठ फिरवली आहे.सर्व सामान्य नागरिकांना प्राथमिक आरोग्य केंद्रातून औषधोपचार मोफत मिळावेत, याकरिता शासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात असताना दुसरीकडे वैद्यकीय अधिकारी उपलब्ध होत नसल्याने खटावसह परिसरातील रुग्णांना सातारा, कोरेगाव किंवा वडूज या ठिकाणी उपचारासाठी जावे लागत आहे.किरकोळ अपघात किंवा एखादी घटना घडल्यानंतर संबंधित रुग्णाला प्राथमिक उपचारासाठी रुग्णालयात आणले जाते. मात्र, डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे रुग्णाला खासगी रुग्णालयात पाठवावे लागत आहे. या सर्व धावपळीत जर एकादा रुग्ण दगावला तर कोणाला दोषी धरायचे? असा प्रश्न ग्रामस्थांपुढे उभा ठाकला आहे. प्रशासनाने या ठिकाणी कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नियुक्ती करून रुग्णांची होणारी परवड थांबवावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. (वार्ताहर)एकाच अधिकाऱ्यावर मदारखटावच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अखत्यारीत १९ गावे, १७ ग्रामपंचायती तर सहा उपकेंद्रे आहेत. या प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणीकरिता येणाऱ्या रुग्णांची सतत वर्दळ असते. परंतु गेल्या काही वर्षापासून हे प्राथमिक आरोग्य केंद्र एकाच वैद्यकीय अधिकाऱ्यावर चालवले जात आहे.आज नाही उद्या या...प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांना निवासी राहणे बंधनकारक असून देखील येथे वैद्यकीय अधिकारी राहताना दिसत नाहीत. सध्या कोणत्याच अधिकाऱ्याकडे रुग्णालयाचा पद्भार नाही. त्यामुळे डिस्कळ किंवा मायणी येथून डॉक्टर तपासणीकरिता येत आहेत.गेल्या चार दिवसांपासून रुग्णालयात तपासणीकरिता येत आहे. परंतु प्रत्येक वेळी डॉक्टर नसल्याचे निदर्शनास येत आहे. कर्मचाऱ्यांकडूनही डॉक्टर नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे मी शेवटी खासगी रुग्णालयात तपासणीकरिता जाण्याचा निर्णय घेतला आहे.- विकास फडतरे, ग्रामस्थआजारामुळे गेल्या दोन दिवसांपासून रुग्णालयात हेलपाटे मारत आहे. परंतु प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर नसल्यामुळे ताडकळत बसावे लागत आहे. वैद्यकीय सेवेअभावी रुग्णांची हेळसांड होत असून, हे किती दिवस चालणार आहे.- तानाजी मोरे, ग्रामस्थ