शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पदाधिकारी, अधिकाऱ्यांत हमरीतुमरी!

By admin | Updated: August 2, 2015 00:11 IST

सातारा पंचायत समिती सभा : माजी उपसभापतींना करावी लागली मध्यस्थी

सातारा : सातारा पंचायत समितीच्या शनिवारी झालेल्या सभेत पंचायत समिती सदस्य प्रवीण धस्के व तालुका कृषी अधिकारी राजेंद्र कांबळे यांच्यात जोरदार हमरी-तुमरी झाली. धस्केंनी कांबळे यांना खात्यातील कर्मचाऱ्याचा पगार रोखण्याच्या मुद्द्यावरून धारेवर धरल्याने दोघांत जोरदार खडाजंगी झाली. माजी उपसभापती विजय काळे यांनी मध्यस्थी करून हा वाद मिटविला. वीज विभाग व एसटी विभागाच्या कारभारावरही सदस्यांनी सभेत ताशेरे ओढले. सभापती कविता चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समिती सभागृहात ही सभा झाली. सभेला राष्ट्रगीताने सुरुवात झाली. सदस्य प्रवीण धस्के यांनी विचारलेल्या जलयुक्त शिवार अंतर्गत होणाऱ्या कामांबाबत कृषी अधिकारी राजेंद्र कांबळे यांना प्रश्न विचारला असता, कांबळे यांनी फडतरवाडी, अंगापूर, देगाव, वर्णे या गावांनी कामे पूर्ण झाल्याचे लिहून दिलेय, असे स्पष्ट केले. त्यावर धस्के यांनी कांबळेंना धारेवर धरले. ‘तुम्ही देत असलेली माहिती चुकीची आहे. तुम्ही सभागृहाची दिशाभूल करत आहात,’ असा आरोप केला. तसेच कृषी खात्यातील पाटील नावाचा कर्मचारी अनेक दिवसांपासून आजारी असताना त्याचा पगार ११ महिन्यांपासून रखडवला आहे. स्वत:च्याच संवर्गातील कर्मचाऱ्यावर कांबळे असा अन्याय करत असल्याचा स्पष्ट आरोप धस्के यांनी केल्यानंतर कांबळे यांनी संताप व्यक्त केला. दोघांत जोरदार खडाजंगी झाली. या वादामुळे सभागृहात स्तब्धता पसरली. धस्के यांनी कांबळे तुम्ही जबाबदारीने बोला, कायद्याचे ज्ञान व शिक्षण घेऊनच आम्ही सभागृहात आलो आहोत. तुमच्या बांधाला माझा बांध नाही. लोकांच्या प्रश्नांबाबत आम्ही बोलतो आहोत, असे सांगितले. हा वाद पेटण्याची चिन्हे दिसत असतानाच माजी उपसभापती विजय काळे यांनी मध्यस्थी करून वादावर पडदा टाकला. विश्रांती साळुंखे, वनिता कणेरकर, जयवंत कुंभार या सदस्यांनीही एसटीच्या कारभाराबाबत जोरदार टीका केली. यावेळी कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेत जिल्ह्यात पहिला क्रमांक मिळविल्याबद्दल डॉ. स्नेहांजली सुतार व त्यांच्या सहकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)