शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

सेवागिरींच्या रथावर ५६ लाख अर्पण

By admin | Updated: January 10, 2016 00:49 IST

यंदा रकमेत वाढ : परकीय चलनांचाही समावेश

पुसेगाव : पुसेगावात आलेल्या भाविक-भक्तांनी एकाच दिवसात ५५ लाख ९३ हजार ५६७ रूपयांची देणगी श्री सेवागिरी महाराजांच्या रथावर मनोभावे अर्पण केली. श्री सेवागिरींच्या ६ ८व्या पुण्यस्मरणानिमित्त शुक्रवार, दि ८ जानेवारी रोजी खटाव तालुक्यातील पुसेगाव येथे रथोत्सव सोहळा उत्साहात पार पडला. रथमिरवणुकीदरम्यान रथावर अमेरीका, इंग्लंडसह विविध देशातील परदेशी चलनांच्या नोटाही भाविकांनी अर्पण केल्या. रथावर अर्पण केलेल्या रकमेत यंदा गतवर्षी पेक्षा २ लाख ७५ हजार ४८५ रुपयांनी वाढ झाली आहे, अशी माहिती श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांनी दिली. गतवर्षीच्या रथोत्सवात ५३ लाख १८ हजार ८२ रुपये देणगी जमा झाली होती.यावर्षी देणगी रक्कमेत लक्षणीय वाढ झाली आहे. श्री सेवागिरी महाराजांच्या रथ मिरवणुकीस शनिवारी सकाळी ११ वाजता प्रारंभ झाला आणि रात्री अकरा वाजता मिरवणूक संपवून रथ माघारी मंदिरात पोहोचला. यानंतर सेवागिरी महाराजांच्या मंदिरासमोर नोटांनी शृंगारलेला रथावरुन नोटांच्या माळा व परदेशी चलन काढून एकत्र करण्यात आले. यावेळी पोलिसांच्या चोख बंदोबस्तात ही सर्व रक्कम श्री नारायणगिरी महाराज भक्त निवासात नेण्यात आली. श्री सेवागिरी देवस्थानचे मठाधिपती सुंदरगिरी महाराज, अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, विश्वस्त मोहनराव जाधव-पाटील, डॉ. प्र. ल. भुजबळ, शिवाजीराव जाधव, विजय द. जाधव, अ‍ॅड. विजयराव जाधव यांच्या देखरेखीखाली विविध वित्त संस्थांच्या अधिकारी व कर्मचारी तसेच ग्रामस्थांच्या मदतीने रथावरील देणगीची रक्कम मोजण्यात आली. रात्री साडे अकरा वाजता प्रत्यक्ष देणगी रक्कम मोजण्यास प्रारंभ झाला. पहाटे चार वाजता देणगी रक्कम मोजण्याचे काम पुर्ण झाले. रथावरील देणगी रक्कम मोजण्याकरता विविध बॅँका व सहकारी पतसंस्था व स्वयंसेवकांनी सहकार्य केले. (वार्ताहर)