शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

श्री सेवागिरी महाराजांच्या रथावर ५३ लाख रुपये अर्पण

By admin | Updated: December 22, 2014 00:08 IST

पुसेगाव यात्रा : अमेरिका, इंग्लंड, भूतान, नेपाळसह विविध देशांतील नोटांचाही समावेश

पुसेगाव : ‘इतर राज्यांसह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पुसेगावात आलेल्या भाविक-भक्तांनी एकाच दिवसात ५३ लाख १८ हजार ८२ रुपयांची देणगी श्री सेवागिरी महाराजांच्या रथावर मनोभावे अर्पण केली. श्री सेवागिरी महाराजांच्या ६७ व्या पुण्यस्मरणानिमित्त दि. २० डिसेंबर रोजी पुसेगाव, ता. खटाव येथे रथोत्सव सोहळा उत्साहात झाला. रथ मिरवणुकीदरम्यान रथावर अमेरिका, इंग्लंडसह विविध देशांतील परदेशी चलनांच्या नोटाही अर्पण केल्या. गतवर्षीच्या रकमेपेक्षा यावर्षी तीन लाख १७ हजार ८२ रुपयांनी वाढ झाली आहे,’ अशी माहिती श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश जाधव यांनी दिली. तीर्थक्षेत्राचा दर्जा असलेल्या पुसेगावच्या श्री सेवागिरी महाराजांच्या भाविक, भक्तांच्या संख्येत वर्षानुवर्षे वाढ होत आहे. गतवर्षीच्या रथोत्सवात पन्नास लाख एक हजार रुपये देणगी जमा झाली होती. यावर्षी पाऊसकाळ चांगला असल्याने शेतकऱ्यांसह सर्वच स्तरातील लोकांमध्ये उत्साहाचे वातावरण असल्याने यावर्षी देणगी रक्कमेत लक्षणीय वाढ झाली आहे. श्री सेवागिरी महाराजांच्या रथ मिरवणुकीस शनिवारी सकाळी अकरा वाजता प्रारंभ झाला आणि रात्री साडेदहा वाजता मिरवणूक संपवून रथ माघारी मंदिरात पोहोचला. श्री सेवागिरी महाराजांच्या मंदिरासमोर रथावरून नोटांच्या माळा व परदेशी चलन काढून एकत्र करण्यात आले. यावेळी पोलीस बंदोबस्तात ही सर्व रक्कम श्री नारायणगिरी महाराज भक्त निवासात नेण्यात आली. श्री सेवागिरी देवस्थानचे मठाधिपती श्री. सुंदरगिरी महाराज, चेअरमन डॉ. सुरेश जाधव, विश्वस्त मोहनराव जाधव-पाटील, डॉ. प्र. ल. भुजबळ, शिवाजीराव जाधव, विजय द. जाधव, अ‍ॅड. विजयराव जाधव यांच्या देखरेखीखाली विविध वित्त संस्थांच्या अधिकारी व कर्मचारी तसेच ग्रामस्थांच्या मदतीने रथावरील देणगीची रक्कम मोजण्यात आली. रात्री अकरा वाजता प्रत्यक्ष देणगी रक्कम मोजण्यास प्रारंभ झाला. पहाटे चार वाजता देणगी रक्कम मोजण्याचे काम पूर्ण झाले. रथावरील देणगी रक्कम मोजण्याकरिता बँक आॅफ महाराष्ट्र, भारतीय स्टेट बँक, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, न्यू सातारा समूह, यशवंत ग्रामीण पतसंस्था, कराड अर्बन बँक, मायणी अर्बन बँक, ज्ञानदीप को-आॅप बँक, सेवागिरी सहकारी पतसंस्था, सिद्धनाथ नागरी सहकारी पतसंस्था, शिवशक्ती सहकारी पतसंस्था, शिवकृपा, कराड मर्चट पतसंस्था, शिवशक्ती पतपेढी व विविध बँका, पतसंस्था व वित्तसंस्थांचे अधिकारी, कर्मचारी, व्यापारी व स्वंयसेवकांनी देणगी मोजण्याचे काम पाहिले. यावेळी पोलीस यंत्रणेने चोख बंदोबस्त ठेवला होता. सचिव अविनाश देशमुख, सहसचिव मारुती वाघ, रघुनाथ दळवी यांच्यासह अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावर्षी ३ लाख १७ हजारांची वाढ...श्री सेवागिरी महाराजांचा लौकिक दिवसेंदिवस वाढत चालला, आहे. गेल्या साठ वर्षांत रथावर जमा होणाऱ्या रकमेत कधीही घट झाली नाही. यावर्षी श्री सेवागिरी महाराजांच्या रथावरील देणगी रक्कमेत तीन लाख १७ हजार ८२ रुपयांनी वाढ झालेली आहे. भारतीय चलनाबरोबरच इतर देशांतील चलनी नोटा भक्तांनी रथावर अर्पण केल्या. यामध्ये युनायटेड अरब अमिरातीच्या चार धीरमच्या १७ नोटा, कतारचा सहा रियाल, सौदी अरेबियाची दहा धीरमची एक नोट, इंग्लंडच्या ५५ पौंडच्या तीन नोटा, यूएसएची डॉलरची एक नोट, कुवेत, बांग्लादेशच्याही नोटांचाही यामध्ये समावेश आहे.(वार्ताहर)