शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

नुनेच्या चित्राची अमेरिकन स्पर्धेसाठी निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2016 23:33 IST

प्रमोद कुर्लेकर यांचा गौरव : अठराव्या आंतरराष्ट्रीय चित्रकला स्पर्धेसाठी निमंत्रण

सातारा : अमेरिकेत भरलेल्या अठराव्या आंतरराष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जगभरातून आलेल्या २ हजार ५३९ चित्रांमधून सातारा तालुक्यातील नुने येथील चित्रकार प्रमोद कुर्लेकर यांच्या चित्राची निवड झाली आहे. यामुळे साताऱ्याची कला साता समुद्रापार सादर करण्याची संधी निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, या स्पर्धेसाठी उपस्थित राहण्याचे निमंत्रण देण्यात आले आहे.अमेरिकेतील व्हर्जेनिया येथे १४ ते १७ एप्रिल या कालावधीत आंतरराष्ट्रीय चित्रकला स्पर्धा आयोजित केल्या आहेत. या स्पर्धेसाठी आलेल्या अडीच हजार चित्रांमधून प्रमोद कुर्लेकर यांच्या चित्राची निवड झाली आहे. कुर्लेकर यांनी सादर केलेले चित्र ग्रामीण भागाशी नाते जोडणारे आहे.नुने येथील चित्रकार प्रमोद कुर्लेकर यांनी सांगली येथील कला विश्व महाविद्यालयात जी. डी. आर्टचे शिक्षण घेतले. त्यानंतर वासुदेव कामत यांच्या मार्गदर्शनाखाली पुणार प्रज्ञा इन्स्टिट्यूट आॅफ फाईन आर्ट, श्री आमदार म्युट एज्युकेशन कॉन्सिल बेंगलोरची शिष्यवृत्ती मिळाली. कुर्लेकर यांना आत्तापर्यंत सोळा राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. मुंबई येथील जहाँगिर आर्ट गॅलरी, नेहरी सेंटर आर्ट गॅलरीमध्ये आत्तापर्यंत चार वेळा प्रदर्शन भरवले आहे. (प्रतिनिधी)आशा भोसलेंकडून कलेला भरभरून दादसुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांच्या ८० व्या वाढदिनी प्रमोद कुर्लेकर यांनी आशा भोसलेंचे चित्र काढले होते. हे चित्र पाहून दस्तूरखुद्द आशा भोसलेंनी दाद दिली होती. ‘हे चित्र पाहिल्यावर मी स्वत:ला आरशातच पाहत आहे, असे वाटते,’ अशा शब्दात कौतुक केले होते.