शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

हरळीत साकारणार आता दुसरे हिवरे बाजार !

By admin | Updated: June 23, 2016 01:02 IST

ग्रामस्थ सज्ज : ‘आमचा गाव आमचा विकास’ योजनेअंतर्गत गावाचा कायापालट करण्याचा ध्यास

खंडाळा : जलसंधारण, पाणलोट विकास, वृक्षारोपण वनसंवर्धन, नाला बांध, ग्रामस्वच्छता, सांडपाणी व्यवस्थापन, कचरा निर्मूलन यासह विविध उपक्रम हाती घेऊन गावाचा कायापालट करण्याचा ध्यास हरळी (ता. खंडाळा) येथील तरुणाईसह ग्रामस्थांनी घेतला आहे. त्यामुळे नव्या प्रकल्पासह हरळीत दुसरे हिवरे बाजार साकारण्यासाठी ग्रामस्थ सज्ज झाले आहेत. ‘आमचा गाव आमचा विकास’ या योजनेअंतर्गत सातारा जिल्हा परिषद व खंडाळा पंचायत समितीच्या वतीने ग्रामविकास मंत्रालयाच्या सूचनेनुसार हरळीत ग्रामस्थ व अधिकाऱ्यांची तीन दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. यामध्ये पहिल्या दिवशी मशालफेरी काढून गावात होणाऱ्या बदलात आपणही सहभागी व्हावे, असे आवाहन ग्रामस्थांना करण्यात आले. त्यानुसार पुढील तीन दिवस गावच्या प्रमुखांसह तरुण वर्ग या कामासाठी पुढे सरसावला. या योजनेअंतर्गत ग्रामपंचायतीच्या १४ व्या वित्त आयोगाच्या ग्रामविकास आराखडा, गाव सूक्ष्म नियोजन, गावच्या शिवारासह नकाशा तयार करण्यात आला आहे. चर्चासत्रे आणि लक्ष्य गट चर्चेतून गावात करावयाचा बदल कसा साकारता येईल, याचा आराखडा बांधण्यात आला. यासाठी या योजनेचे तज्ज्ञ मार्गदर्शक संदीप ननावरे यांनी सविस्तर माहिती दिली.गावातील प्राथमिक शाळा, अंगणवाडी सुधारणा, आरोग्य शिक्षण, गावातील प्रमुख रस्ते, स्वच्छता, रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण, सांडपाणी निचरा, पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण योजना राबविण्यासाठी कृतिसत्र घेण्यात आले. गावच्या शिवारातील पाणी गावातच अडविण्यासाठी लोकसहभागातून दोन बंधारे बांधून पूर्ण करण्यात आले आहेत. उर्वरित क्षेत्रातही पाणी साठवणीसाठी योजना सुरू केली जात आहे. हरळी गावाभोवती असणाऱ्या डोंगर उतारावर आडवे चर घेऊन त्यामध्ये वृक्षारोपण करण्याची मोहीम तरुणांनी हाती घेतली आहे. बीजारोपण आणि रोपलागवड मोहिमेसाठी सामाजिक वनीकरण विभागाचे सहकार्य मिळणार आहे. या कार्यशाळेसाठी गटविकास अधिकारी दीपा बापट, विस्ताराधिकारी पवेकर, वनक्षेत्र अधिकारी शिंदे, सरपंच अवंतिका जावळे, उपसरपंच विजय शिंदे, नंदा निकम, कृष्णा बरकडे, अर्चना शिंदे, पूनम बरकडे, आबासो बरकडे, ग्रामसेवक सुनील धायगुडे, संतोष बरकडे, कांतिलाल निकम, राहुल निकम, मोहन जावळे, चंद्रकांत शेलार, वसंत शेलार, संदीप ननावरे, संतोष देशमुख यांनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी) गावाभोवती जैविक कुंपणया कार्यशाळेदरम्यान तज्ज्ञ मार्गदर्शकांसह ग्रामस्थांनी शिवारफेरी केली. यामध्ये गावच्या शिवारात असणाऱ्या वृक्षसंपदेचा अभ्यास करण्यात आला. गावातील शेतीला वन्यप्राण्यांचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी उपलब्ध वनस्पतींचाच वापर करून जैविक कुंपण करण्याची योजना आहे. याशिवाय याच वनराईत उपलब्ध फळांपासून प्रक्रिया उद्योग महिला बचत गटांच्या माध्यमातून उभारले जाणार आहेत.हरळी हे गाव छोटीशी लोकवस्ती असणारे आहे. भौगोलिक परिस्थितीचा फायदा गावाला होण्यासाठी काही कामे होणे गरजेचे आहे. तरुणांच्या सहभागातून हे सहजशक्य आहे. गावच्या विकासाला याची मदतच होईल.-विजय शिंदे, उपसरपंच हरळी