शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

‘प्राधिकरण’चे खड्डे आता पालिकेच्या उरावर!

By admin | Updated: May 7, 2016 00:50 IST

काम करण्यास ठेकेदारांकडून नकार : पाणीपुरवठ्याच्या ढिसाळ कारभारामुळे पालिकेच्या खांद्यावरच एक वर्षापासून बोजा

दत्ता यादव --सातारा  --निधी उपलब्ध होत नसल्याने शहरातील पाणीपुरवठ्यांची कामे करण्यास प्राधिकरणने नकार दिला असून आजपर्यंतची गचाळ कामे दुरूस्त करण्याचा विडा यापुढे पालिकेलाच उचलावा लागणार असल्याचा गौप्यस्फोट मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला. तर दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत पालिका अधिकाऱ्यांनीच यापुढे पालिका स्वत: कामे करणार असल्याचे सांगितले आहे, असे स्पष्टीकरण जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता व्ही. एल. कुलकर्णी यांनी दिले.गेल्या काही वर्षांपासून सातत्याने जीवनप्राधिकरणच्या नावाने लोकप्रतिनिधींपासून नगरसेवकापर्यंत सगळ्यांनीच खडे फोडले. कामाची संथगती आणि निकृष्ठ दर्जा, असा आरोपही वारंवार प्राधिकरणवर झाला. वर्षभर शहरातील रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली होती. सुधारीत पाणी पुरवठा योजना दीड वर्षांमध्ये पूर्ण करण्याचा ठराव झाला होता. मात्र प्राधिकरणने या योजनेसाठी तब्बल पाच वर्षे लावली. परंतु अद्यापही या योजनेची कामे अपूर्ण आहेत, असा पालिकेचा आरोप आहे. वर्षभरापूर्वी प्राधिकरणने कामे करण्यास नकार दिल्याने त्या दिवसांपासून शहरातील सर्व पाईपलाईनची कामे पालिकाच करत असल्याचे बापट यांनी सांगितले. प्राधिकरणने अर्धवट कामे सोडल्यामुळे तब्बल साडेसात कोटी वाढीव खर्च झाला असल्याचा गौप्यस्फोटही संबंधितांनी केला.दरम्यान, सुधारित पाणीपुरवठा योजनेच्या कामाची ८ कोटी थकबाकी पालिकेकडून यायची आहे. या योजनेचे काम करत असताना निधीची कमतरता भासत होती. त्यामुळे ठेकेदारांनी कामे बंद केली. साहजिकच ही योजना रखडली गेली. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत यापुढील कामे पालिकाच करण्याचा निर्णय झाला असल्याची माहितीही अभियंता कुलकर्णी यांनी दिली.पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट आणि प्राधिकरणचे कुलकर्णी यांनी परस्पर विधाने केल्यामुळे या योजनेमध्ये नेमका गोलमाल काय, हे सातारकरांच्या समजण्यापलिकडे आहे.