शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम झाला तरी...! इराणचे खामेनी बेपत्ता, इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन सुरूच
2
"दिवा विझल्यावर.…’’, भास्कर जाधवांची नाराजी व्यक्त करण्यासाठी ‘स्टेटस’नीती, चर्चांना उधाण
3
Maharashtra Politics : “तुझ्या अंगावरचे कपडे आम्ही दिलेत, बापाला पेरणीला पैसेही”, भाजपाच्या लोणीकरांचं वादग्रस्त विधान
4
FASTag वापरणाऱ्यांसाठी खूशखबर! आता फक्त टोल नाही, तर पार्किंग-चार्जिंगसह 'या' कामांसाठीही वापरता येणार?
5
धक्कादायक! रील बनवण्यासाठी महिलेने चक्क रेल्वे रुळांवरून चालवली कार, अखेरीस...  
6
Shaktipeeth Expressway: ‘शक्तिपीठ’साठी ९२ गावांची मोजणी पूर्ण, ऑगस्टपर्यंत मोजणी; डिसेंबर अखेरीस भूसंपादन 
7
इराणने युद्धात शौर्य दाखवले, मी आता त्यांना रोखणार नाही; नाटोच्या परिषदेत ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य
8
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
9
५० हजार पगारात कोणती कार तुमच्यासाठी ठरेल फायदेशीर?; '२०-४-१०' फॉर्म्युला वापरा
10
लढाई संपली, आता कमाईची संधी! सेन्सेक्स ४०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
11
इराणच्या अण्वस्त्रांचे मोठे नुकसान! सीआयएच्या अहवालात मोठा खुलासा
12
"इतक्या लहान वयात काय गरज आहे?", हिंदी भाषा सक्तीवरुन मकरंद अनासपुरे थेटच बोलले
13
जगातील सर्वांत महागडे लग्न, खर्च तब्बल ७,१३९ कोटी रुपये
14
क्रिप्टोची लालसा, पैशाची हाव अन् प्रियाच्या सौंदर्याची भुरळ; 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये केली देशाशी गद्दारी
15
Viral Video: विमानात प्रवाशाचं लज्जास्पद कृत्य; कर्मचाऱ्यांनी रंगेहाथ पकडलं, लोकांनी काढला व्हिडीओ!
16
मुंबईच्या सर्वात महागड्या एरियात 'पैशांचा पाऊस'! एका ऑफिससाठी १००० कोटींचं भाडं, कोण आहे मालक?
17
रस्त्यावर उत्सव साजरा करणाऱ्यांवर मेक्सिकोत गोळीबार; १२ जणांचा मृत्यू, २० जण जखमी
18
धक्कादायक! डीजे ऑपरेटरच्या प्रेमात मुलगी आंधळी झाली, प्रियकराला घरी बोलावून आईची हत्या केली
19
खात्यामध्ये किमान १० हजार शिल्लक नसेल तर होणार दंड, कापणार एवढी रक्कम, या बँकेचे आदेश
20
प्रवाशांनी भरलेली बस पूर आलेल्या नदीत कोसळली, उत्तराखंडमध्ये भीषण अपघात

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आता आॅनलाईन अर्ज

By admin | Updated: December 2, 2014 00:22 IST

आठ ग्रामपंचायतींसाठी २३ रोजी मतदान, मतमोजणी

सातारा : जिल्ह्यात आता ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ‘आॅनलाईन’ पद्धतीने अर्ज भरले जाणार आहेत. जानेवारी ते एप्रिल २०१५ या कालावधीत मुदत संपणाऱ्या आठ ग्रामपंचायतीसाठी तसेच साठ ग्रामपंचायतंच्या पोटनिवडणुकीसाठी २३ डिसेंबर रोजी मतदान आणि मतमोजणी होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातून देण्यात आली. दरम्यान, जिल्ह्यात पहिल्यांदाच अशा पद्धतीने अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. जानेवारी ते एप्रिल २०१५ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक तसेच विविध कारणाने रिक्त झालेल्या सदस्य पदाच्या पोटनिवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने २९ नोव्हेंबर रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या कार्यक्रमानुसार सातारा जिल्ह्यातील आठ ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक आणि साठ ठिकाणी पोटनिवडणुका होणार आहेत. यामध्ये सातारा तालुक्यातील आष्टे, पाटणमधील कोदळ, खंडाळा तालुक्यातील सालव, दापकेघर, गोळेगाव, देवघर, फलटण तालुक्यातील परहर आणि खटाव तालुक्यातील एका अशा आठ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी दि. २९ नोव्हेंबर २०१४ पासून आचारसंहिता लागू झाली आहे. हा निवडणूक कार्यक्रम राबविण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने खालील सूचनांचे पालक करण्याबाबत काही सूचना केल्या आहेत. इच्छुक उमेदवारांनी त्यांची अर्ज आता आॅनलाईन पद्धतीने भरावे लागणार आहेत. निवडणूक कार्यक्रमाअंतर्गत मतदान व मतमोजणी एकाचदिवशी म्हणजेच मंगळवार, दि. २३ डिसेंबर रोजी होणार आहे. राखीव जागेवर निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या प्रत्येक व्यक्तींकडून नामनिर्देशन पत्राबरोबर जातीचे प्रमाणपत्र व जातपडताळणी समितीने दिलेल्या जात वैधता प्रमाणपत्राची प्रमाणित प्रत आवश्यक आहे. (प्रतिनिधी)