शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

आता मंत्रीच करतील आंदोलन !

By admin | Updated: April 3, 2016 03:49 IST

पालकमंत्र्यांचा इशारा : दुष्काळ बैठकीत कागदी घोडे; राष्ट्रवादीचे आमदारही प्रचंड संतप्त

सातारा : ‘राज्यातील इतर जिल्ह्यांप्रमाणेच साताऱ्यालाही दुष्काळाचे चटके बसू लागले आहेत. दुष्काळी माण, खटाव, फलटण, कोरेगाव या तालुक्यांसह कमी पाऊस झालेल्या पश्चिमेकडील तालुक्यांमधूनही पिण्याचे टँकर, चारा छावणी तसेच नळ पाणी योजना, विंधन विहिरींची मागणी आहे. मात्र, कागदी घोडे नाचवत प्रस्ताव दडपून ठेवले जात आहेत. वास्तविक दुष्काळाबाबत जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनीच अधिक सजगपणे काम करायला हवे होते; पण तसे घडताना दिसत नसल्याने लोकप्रतिनिधींसह सरकारमधील मंत्र्यांनाही आता आंदोलनात उतरावे लागेल,’ असा संतापजनक इशारा पालकमंत्री विजय शिवतारे यांनी दिला. पालकमंत्र्यांनी शनिवारी नियोजन भवनात जिल्ह्याची टंचाई आढावा बैठक घेतली. यावेळी खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, उपाध्यक्ष रवी साळुंखे, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव देशमुख, उपजिल्हाधिकारी (महसूल) भारत वाघमारे उपस्थित होते. या बैठकीत साताऱ्यातील आमदार पोटतिडकीने दुष्काळी उपाययोजनांची मागणी करत असताना जिल्ह्यातील अधिकारी मात्र दुष्काळ नाही हेच दाखविण्याचा आटापिटा करताना पाहायला मिळत होते. आमदार शशिकांत शिंदे, आमदार जयकुमार गोरे, आ. प्रभाकर घार्गे, आ. मकरंद पाटील, आ. शंभूराज देसाई, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. आनंदराव पाटील यांनी दुष्काळी परिस्थितीबाबत अत्यंत अभ्यासपूर्णरीत्या आणि आग्रही मते मांडली. गेल्या दीड महिन्यापासून चारा छावण्या मागण्यांचे प्रस्ताव प्रशासनाकडे पडून आहेत, यावर कोणतीच कार्यवाही केली जात नाही. चाऱ्याबाबतचे प्रशासनाकडील आकडे फसवे आहेत. प्रत्यक्ष सर्व्हे करून गरज असलेल्या तालुक्यांत चारा छावण्या सुरू करा, अशी मागणी आ. जयकुमार गोरे यांनी केली. आ. शशिकांत शिंदे यांच्यासह सर्वच आमदारांनी गोरेंच्या मागणीला पाठिंबा दर्शविला. जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या कारभारावरही आमदारांनी जोरदार ताशेरे ओढले. नळपाणीपुरवठा योजनांचे प्रस्ताव पाठवूनही ते कार्यकारी अभियंता ए. एस. कोळी यांच्याकडून अडविले जात आहेत. विंधन विहिरींची मागणी असताना भूजल विभाग टाळाटाळ करत आहे. दुष्काळाबाबत या विभागातील अधिकाऱ्यांना गांभीर्य राहिलेले नाही, असे आरोप आमदारांनी केले. तसेच पालकमंत्र्यांनी लक्ष घालून पुन्हा बैठक बोलाविण्याची मागणी केली. उद्या मुंबईत बैठक पाणीपुरवठा योजनांचे प्रस्ताव मंजुरीसाठी सर्व विभागांनी एकत्र बसून कागदपत्रांची पूर्तता करावी. उद्या, सोमवारी मुंबईत सर्व आमदार, जिल्हाधिकारी यांना सोबत घेऊन बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत सर्व प्रस्तावांना मंजुरी देण्यात येणार आहे. ...सात दिवसांत टँकर अन् छावण्या माण-खटाव तालुक्यांतील तीव्र दुष्काळी परिस्थितीचा विचार करता या दोन तालुक्यांमध्ये चारा छावण्या सुरू करण्यात येतील, असे आश्वासन पालकमंत्री विजय शिवतारे यांनी दिले. दरम्यान, मागणीनंतर सात दिवसांत टँकर पुरवठा सुरू करा. दुष्काळाबाबत दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.