शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

...आता दाखले वेगाने मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2019 23:07 IST

सातारा : ‘जनतेला जातीचे तसेच जातपडताळणीचे दाखले वेगाने कसे मिळतील, यासाठी शासन आग्रही असून, या दाखल्यांच्याबाबतीत जास्तीत जास्त पारदर्शकता ...

सातारा : ‘जनतेला जातीचे तसेच जातपडताळणीचे दाखले वेगाने कसे मिळतील, यासाठी शासन आग्रही असून, या दाखल्यांच्याबाबतीत जास्तीत जास्त पारदर्शकता कशी येईल, यावर भर दिला जाणार आहे,’ अशी माहिती सामाजिक न्यायमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी येथील शासकीय विश्रामगृहावर रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.मंत्री डॉ. खाडे म्हणाले, ‘जातीचे तसेच जातपडताळणीचे दाखले वेळेत मिळत नसल्याने अनेकांना शासकीय नोकरी मिळण्यात अडथळे निर्माण होतात. शिक्षणाच्या बाबतीतही या समस्या जाणवतात, त्यामुळे हे दाखले उमेदवारांना लवकरात लवकर कसे मिळतील, यासाठी शासन नियोजन करत आहे. ‘फास्ट ट्रॅक’ यंत्रणेच्या माध्यमातून हे केले जाणार आहे. प्रशासकीय यंत्रणेला ठराविक मुदतीत दाखले देण्याची सक्ती केली जाईल, यासाठी असलेल्या कायद्याची कठोरपणे अंमलबजावणी करून हे दाखले देण्यासाठी पारदर्शकता आणण्यावर भर दिला जाणार आहे.’सामाजिक न्याय खाते हे गरीब लोकांच्या कल्याणासाठी काम करते, सुदैवाने मंत्रिपदाचा पदभार घेताच या खात्यासाठी सरकारने १२०० कोटींची तरतूद केली. गतवर्षीच्या बजेटपेक्षा यंदा ५०० रुपये सामाजिक न्याय खात्याला वाढवून मिळाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गरिबांच्या उथ्थानासाठी नवनवीन योजना राबविण्यावर भर दिला आहे, असेही डॉ. खाडे यांनी सांगितले.दरम्यान, दिव्यांग व्यक्तींना घरकुल बांधून दिले जाणार आहे. ८० टक्के अपंगत्व असणाऱ्या दिव्यांगांना त्याचा लाभ होईल. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्ताने संपूर्ण वर्षभर विविध कामे केली जाणार आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठीही सरकार विशेष योजना राबवत आहे, असेही त्यांनी सांगितले.सातारा जिल्हा परिषदेला पूर्णवेळ समाजकल्याण अधिकारी कधी देणार आहात? या प्रश्नावर मंत्री डॉ. खाडे म्हणाले, ‘संपूर्ण राज्यात ठिकठिकाणी ही पदे रिक्त आहे. एका अधिकाºयाकडे दोन पदभार दिले आहेत. ही पदे भरण्यासाठी शासनाने तयारी सुरू केली आहे. लवकरच यासाठी परीक्षा घेतली जाईल.’अण्णा भाऊंच्या वारसांना न्याय देऊलोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या वारसांना न्याय मिळवून देण्यासाठी मंगळवार किंवा बुधवारी मंत्रालयात बैठक आयोजित केली जाणार आहे, असेही मंत्री डॉ. खाडे यांनी सांगितले.‘न्याय भवन’ बांधकामाची चौकशीसाताºयातील सामाजिक न्याय भवनाच्या बांधकामात दोष असल्याच्या तक्रारी आहेत. याबाबत विचारले असता डॉ. खाडे यांनी या कामाची चौकशी करण्याचे आश्वासन दिले.येळगावकरांसोबत काम करूमाण-खटावचे माजी आमदार डॉ. दिलीपराव येळगावकर यांच्याशी आपली जुनी मैत्री आहे. विरोधात काम करत असताना त्यांनी आणि मी अधिवेशन काळात विधिमंडळ दणाणून सोडले होते. अनेक वृत्तपत्रांच्या हेडलाईन्स आमच्या अनोख्या आंदोलनांनी गाजल्या. आता डॉ. येळगावकरांसोबत पुन्हा काम करण्याची आपली इच्छा आहे, असेही डॉ. खाडे यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.