शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आता ६७ पैसेवारीच्या गावांचाही समावेश

By admin | Updated: September 17, 2015 22:52 IST

दुष्काळ : इगतपुरी, त्र्यंबकेश्वरलाही लाभ

घोटी : राज्य शासनाने दुष्काळग्रस्त भागाचे निकष लावताना पैसेवारीच्या टक्केवारीत सुधारणा केली असून, शासनाच्या नवीन धोरणानुसार इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यातही पर्जन्यमान कमी झाले असल्याने नवीन निकषाच्या पैसेवारीत ंहे तालुके बसत असल्याने या दोन्ही तालुक्यात दुष्काळग्रस्तांचे लाभ मिळणार असल्याची माहिती आमदार निर्मला गावित यांनी दिली.पावसाचे माहेरघर अशी ओळख असणाऱ्या इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर या दोन्ही तालुक्यात पावसाने दगा दिल्याने दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली आहे. मात्र असे असताना शासनाच्या दि. ४ मार्च १९८९च्या ठरावानुसार मागील दहा वर्षाच्या कालावधीत तीन उत्तम उत्पन्नाची सरासरी हे प्रमाण उत्पन्न समजून पन्नास पैशापेक्षा कमी पैसेवारी आलेल्या गावांना दुष्काळग्रस्त जाहीर करून शासनाच्या विविध सोयी सवलती देण्यात येत होत्या.अखेर शासनाने या मागणीची दखल घेत व परिस्थितीचे अवलोकन करून आपल्या निर्णयात सुधारणा केली असून, त्याबाबतचे नवीन परिपत्रक जारी केले आहे. यानुसार मागील पाच वर्षाच्या कालावधीतील उत्पन्नाची सरासरी प्रमाण उत्पन्न समजून ६७ पैशापेक्षा कमी पैसेवारी असलेल्या गावांना दुष्काळग्रस्त जाहीर करून त्यांना सोयी सवलती लागू करण्यात येणार आहे. तसे आदेश शासनाच्या महसूल विभागाने राज्यातील कोकण, नाशिक, पुणे, औरंगाबाद, अमरावती व नागपूर आदि विभागाच्या विभागीय आयुक्ताना दिले आहेत.या नवीन निकषात इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुका बसत असल्याने आता या दोन्ही तालुक्याला त्याचा लाभ मिळणार असल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांनी शासनाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. (वार्ताहर)