शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

आता स्त्री-पुरुष समतेसाठी सर्वधर्मीय प्रार्थनास्थळांवर लढा

By admin | Updated: April 12, 2016 00:45 IST

‘अंनिस’चा कृती कार्यक्रम : भेदभाव संपुष्टात आणण्यासाठी प्रयत्न

सातारा : गुढीपाडव्या दिवशी शनिशिंगणापूरच्या चौथऱ्यावर अखेर महिलांना प्रवेश मिळाला. १९९८ पासू महाराष्ट्र अंनिसने डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या नेतृत्वाखाली हा प्रश्न लावून धरला होता. त्याला यश मिळाले असून आता राज्यातील सर्वधमीय प्रार्थनास्थळांवर स्त्री-पुरुष समतेसाठी लढा उभारणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र अंनिसचे राज्य सरचिटणीस प्रशांत पोतदार व राज्य सरचिटणीस डॉ. हमीद दाभोलकर यांनी पत्रकाद्वारे दिली.पत्रकात म्हटले आहे की, डॉ. दाभोलकरांचे मारेकरी अजूनही मोकाट असले तरी त्यांचे विचार हे समाजात पुढे चालले आहेत. शनिशिंगणापूरचा महिला प्रवेश हा त्याची साक्ष देतो. स्त्रियांमध्ये आपल्या समान हक्कांविषयी जागृती निर्माण व्हावी, हीच शनिशिंगणापूरच्या लढाईची मूळ प्रेरणा होती. त्या पातळीवर डॉ. दाभोलकरांनी सुरू केलेला शनिशिंगणापूरचा लढा हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या काळाराम मंदिर सत्याग्रह व साने गुरुजींच्या पंढरपूर सत्याग्रहाशी आपली नाळ सांगतो. शनिशिंगणापूरच्या समतेच्या लढाईत एक पाऊल पुढे पडले असले तरी देवाच्या आणि धर्माच्या नावावर महिलांचे होणारे शोषण थांबविण्यासाठी अंनिस सातत्याने कटिबद्ध राहील. केवळ हिंदू धर्मीय प्रार्थनास्थळे नव्हे तर सर्वधर्मीय प्रार्थनास्थळांवर स्त्री-पुरुष भेदभावासह कुठलाही भेदभाव केला जाऊ नये, यासाठी महाराष्ट्र अंनिस येत्या काळात कालबद्ध कृती कार्यक्रम हाती घेणार आहे. तसेच हाजी अली दर्ग्यातील महिलांना प्रवेशाची जनहित याचिका अजूनही प्रलंबित आहे व ही लढाई लढणाऱ्या महिलांच्या बरोबर अंनिस त्यांच्या हक्कासाठी लढाई देईल. (प्रतिनिधी)अहमदनगरमध्ये राज्यव्यापी परिषदपुढील रूपरेषा ठरविण्यासाठी दि. १ मे रोजी अंनिसचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील व अध्यक्ष डॉ. एन. डी. पाटील यांच्या उपस्थितीत अहमदनगर येथे राज्यव्यापी परिषद घेतली जाणार आहे. त्यामध्ये पुढील लढाईची ध्येयधोरणे जाहीर केली जाणार आहेत.