शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

‘एटीएम’चा अतिवापर ग्राहकांसाठी आत्ता महागात

By admin | Updated: January 6, 2017 23:07 IST

मोफतची मुदत संपली : पुढील कार्यवाहीबाबत बँकाही आदेशाच्या प्रतीक्षेत

सातारा : नोटाबंदीनंतर उद्भवलेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत कोणत्याही एटीएममधून पैसे काढण्यासाठी शुल्क लागणार नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे ‘दिसले एटीएम की काढ पैसे’ अशी सवय लागली आहे. मोफतची मुदत संपल्याने भविष्यात यासाठी शुल्क आकारले जाऊ शकते. त्यामुळे सवयीवर आवर घालावा लागणार आहे. काळा पैसा बाहेर काढण्यासाठी चलनातून पाचशे व हजार रुपयांच्या नोटा ८ नोव्हेंबर रोजी रद्द ठरविल्या. त्यानंतर स्वत:कडील जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी किंवा खात्यात जमा करण्यासाठी ग्राहकांच्या बँकेत रांगा लागल्या होत्या. बँकेतून चलनातील नोटा काढल्या जात होत्या. त्या तुलनेते भरणा होत नसल्याने आर्थिक कोंडी झाली. चलनात आलेल्या पाचशे व दोन हजार रुपयांच्या नवीन नोटांचा आकार वेगळा असल्याने एटीएममधील ट्रे बदलणे गरजेचे होते. त्यामुळे असंख्य एटीएम बंद अवस्थेत होते. या काळात ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत कोणत्याही एटीएममधून पैसे काढले तरी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही, असे सांगण्यात आले होते. त्यामुळे एटीएम केंद्र दिसले की, रांगेत उभे राहण्याची सवयच लागली होती. पैसे काढण्यावरही मर्यादा असल्याने त्यावरही अनेकांनी उपाय शोधले आहेत. दोन-तीन बँकांमध्ये खाते उघडून एटीएम घेतले आहेत. प्रत्येक एटीएममधून दररोज पैसे काढले जात होते. सेवानिवृत्ती वेतन व पगार काढण्यासाठी आता पुन्हा बँका व एटीएमसमोर रांगा दिसणार आहेत. कोणत्याही एटीएममधून पैसे काढण्यासाठी दिलेली मुदत संपली असल्याने आता पहिल्या ठराविक व्यवहारानंतर शुल्क आकारले जाऊ शकते. त्यामुळे आतापासूनच सावधानता बाळगणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी)बंद एटीएमची साठीनोटाबंदीच्या निर्णयाला दोन महिने झाले आहेत. साठ दिवसांनंतरही सातारा जिल्ह्यातील अनेक एटीएम बंद आहेत. त्यामुळे अनेक बँकांच्या ग्राहकांना इतर बँकांच्या एटीएमवर अवलंबून राहावे लागणार आहे. त्यामुळे सर्व एटीएम सुरू केल्यानंतरच हा निर्णय घ्यावा, अशी मागणी आहे.