शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
2
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
3
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
4
पुन्हा एकदा निराशा! गुंतवणूकदारांचे ३.२४ लाख कोटी बुडाले! 'या' कारणांमुळे बाजार धडाम
5
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'
6
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
7
VLF Mobster: इतकी स्वस्त की...; 'या' स्कूटरमुळं इतर दुचाकी निर्माता कंपन्यांना फुटला घाम!
8
२० दिवस अत्यंत धोक्याचे! मंगल-हर्षल षडाष्टक योग; घात-अपघातापासून कसे वाचावे?
9
आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'वर संतापले समीर वानखेडे, गौरी-शाहरूख खानविरोधात मानहानीचा खटला केला दाखल
10
VIRAL : भिंतीसारखं दिसणारं घर आतून आहे आलिशान; व्हिडीओ पाहून लोक थक्क, किंमत ऐकून धक्का बसेल!
11
नवरात्र २०२५: ५ कामे अवश्य करा, नैराश्य दूर होईलच, आनंद वाटेल; भाग्योदय, घरात शुभ तेच घडेल! 
12
‘आमदार फोडण्यासाठी, शक्तीपीठ महामार्गासाठी सरकारकडे पैसे आहेत पण…’, काँग्रेसची बोचरी टीका  
13
कर्जमुक्त होणे म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य नव्हे! ३० वर्षीय तरुणाची 'ती' चूक, सीएने सांगितला मोठा धोका
14
फायद्याची गोष्ट! स्टील, अ‍ॅल्युमिनियम की लोखंड... स्वयंपाकासाठी कोणतं भांडं सर्वात बेस्ट?
15
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
16
"आई माझ्या आयुष्यातली क्रिटिक...", शंतनू मोघेची प्रतिक्रिया, प्रियाच्या निधनानंतर मालिकेत कमबॅक
17
निवडणूक आयोगाने मतमोजणीबाबत घेतला मोठा निर्णय, आता पोस्टल बॅलेटनंतरच होणार EVM मधील मतांची मोजणी 
18
नाशिक होणार हायटेक सिटी! एनएमआरडीए २ हजार २३० चौ.किमीचा विकास आराखडा, सहा तालुक्यांचा समावेश
19
Navratri 2025: अष्टमी-नवमीला 'या' दिशेला दिवा लावा; अखंड दिवा लावण्याचे लाभ मिळतील 
20
सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, १० ग्रॅम सोन्याची किंमत किती? चांदी महागली

आता तिन्ही सभापती दक्षिणचे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 00:09 IST

विधनासभेला ‘लढायचं नक्की; पण कसं ते नेत्यांनी ठरवावं,’ असं उंडाळकर समर्थकांनी मेळावा घेऊन जाहीर केलंय. माजी मंत्री विलासराव पाटील यांची राजकीय खेळी तर त्या दृष्टीनेच नेहमी सुरू असते. नुकतीच कºहाड तालुका शेती उत्पन्न

प्रमोद सुकरे ।कºहाड : विधनासभेला ‘लढायचं नक्की; पण कसं ते नेत्यांनी ठरवावं,’ असं उंडाळकर समर्थकांनी मेळावा घेऊन जाहीर केलंय. माजी मंत्री विलासराव पाटील यांची राजकीय खेळी तर त्या दृष्टीनेच नेहमी सुरू असते. नुकतीच कºहाड तालुका शेती उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी महादेव देसाई यांची झालेली निवड त्याचाच भाग म्हणावा लागेल.

कºहाड दक्षिण विधानसभा मतदारसंघ हा काँगे्रसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. विलासराव पाटील-उंडाळकर यांनी या मतदार संघाचे सलग सातवेळा प्रतिनिधित्व केले आहे. गत विधानसभा निवडणुकीत तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काँगे्रसच्या तिकिटावर निवडणूक लढवून दक्षिणेतून काँगे्रसच्या विजयाची परंपरा कायम ठेवली. मात्र, बंडखोरीचे अस्त्र बाहेर काढलेल्या विलासराव पाटील-उंडाळकरांना या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला. तर भाजपमधून नशीब आजमावणाऱ्या डॉ. अतुल भोसले यांनाही विजयापासून दूरच राहावे लागले.

गत चार-साडेचार वर्षांत कºहाड दक्षिणच्या राजकीय पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. पृथ्वीराजबाबा आता माजी मुख्यमंत्री झाले आहेत. तर विलासराव पाटील-उंडाळकर माजी आमदार बनले आहेत. डॉ. अतुल भोसले पंढरपूर देवस्थान समितीचे अध्यक्षपद भूषवित असल्याने राज्यमंत्री झाले आहेत. मात्र, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी दक्षिणच्या फडात या तिघांच्याही व्यूहरचना सुरू आहेत.

आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या फंडातून दक्षिणेत विकासकामांवर जोर दिलाय. तर डॉ. अतुल भोसले यांनीही सरकारमध्ये असल्याने मोठ्या प्रमाणात मतदार संघात विकास निधी आणला आहे. मात्र, असे असले तरी राजकीय मुत्सद्दीपणामुळे तालुक्यातील सर्वच महत्त्वाच्या संस्थांवर विलासराव पाटील-उंडाळकरांची पकड मजबूत असून, त्या माध्यमातून लोकांची कामे करून आपली नाळ त्यांनी कायम ठेवली आहे.

कºहाड दक्षिणच्या फडात काँगे्रसचे उमेदवार कोण? भाजपचे उमेदवार कोण? हे योग्यवेळी स्पष्ट होईलच; पण विलासराव पाटील यांचे वारसदार अ‍ॅड. उदयसिंह पाटील या रिंगणात नक्की असणार, असा विश्वास त्यांचे कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत. आता कोणत्या पक्षाचे उमेदवार असणार, हे मात्र त्यांचे त्यांनाच माहिती.अडीच वर्षांची वाटणी फायद्यातकºहाड पंचायत समितीत सध्या विलासराव पाटील-उंडाळकर व उत्तरचे राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब पाटील यांची सत्ता आहे. सुरुवातीलाच अडीच वर्षांसाठी सभापतिपद हे बाळासाहेब पाटील समर्थकांना देण्यात आले; पण त्यानंतर वर्षभरापूर्वी अडीच वर्षांच्या सभापतिपदाची संधी उंडाळकर गटाला मिळाली. त्यावेळी उंडाळे खोºयातील येळगावच्या फरिदा इनामदार यांना त्यांनी सभापतिपद दिले. याचा फायदा विधानसभेला व्हावा, हीच त्यामागची अटकळ मानली जाते. 

कार्वेच्या थोरातांनाही ‘लॉटरी’कºहाड तालुका खरेदी-विक्री संघात माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकरांची एक हाती सत्ता आहे. येथेही दीड वर्षापूर्वी सभापतिपदात बदल करत कºहाड दक्षिणमधील कार्वेच्या रंगराव थोरात यांना सभापतिपदाची संधी देण्यात आली आहे. तर कºहाड उत्तर विधानसभा मतदार संघात उपसभापतिपद दिले आहे. हे फेरबदलही विधानसभा डोळ्यासमोर ठेवूनच केले आहेत, हे निश्चित.कलेच्या देसार्इंना संधीकºहाड तालुका शेती उत्पन्न बाजार समितीत विलासराव पाटील-उंडाळकर व डॉ. अतुल भोसले गटाची सत्ता आहे म्हणे; पण इथं फक्त उंडाळकरांचेच चाललेले पाहायला मिळते. आगामी विधानसभा डोळ्यासमोर ठेवून कºहाड उत्तरमधील असणाºया सभापतींचा राजीनामा घेऊन दक्षिण मतदार संघातील राजकीयदृष्ट्या संवेदनशील असणाºया काले गावातील महादेव देसाई यांना नुकतीच सभापतिपदाची संधी दिली आहे. आता राजकीय समतोल साधताना उत्तरेतील संचालकांना उपसभापतिपद दिले जाईल, अशी चर्चा आहे.कोयना बँकेतही दक्षिणराज!विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या नेतृत्वाखाली वाटचाल करणाºया कोयना बँकेतही ‘दक्षिण’राज पाहायला मिळतेय. शेणोलीचे रोहित पाटील त्याचे अध्यक्षपद भूषवित आहेत. तर कºहाड शहरातील विजय मुठेकर यांना उपाध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे. रयत सहकारी साखर कारखान्याची धुरा अ‍ॅड. उदयसिंह पाटील स्वत: सांभाळत आहेत. तर दक्षिणेतील येणके गावचे अप्पासाहेब गरूड कारखान्याचे उपाध्यक्ष आहेत.