शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

कट्टे वाटपाला आता तरी मुहूर्त काढा!--निवडणूक झाली, आता कामाचं बोला

By admin | Updated: October 23, 2014 00:10 IST

राजवाडा मंडई : दोन्ही आघाड्यांच्या लपंडावात विक्रेत्यांची गोची

सातारा : पालिकेने शहरात उभारलेल्या टोलेजंग भाजी मंडई व फ्रूट मार्केटचे निवडणुकीआधी थाटात उद्घाटन झाले; परंतु अजूनही विक्रेत्यांना जागा वाटप झालेले नाही. दोन्ही आघाड्यांचा मेळ बसत नसल्याने मंडईतील कट्टे वाटपाचे घोडे अडले आहे.शहरात फूटपाथवर बसून भाजी तसेच फळ विक्री करणाऱ्यांची सोय व्हावी, तसेच शहरातील फूटपाथ पादचाऱ्यांसाठी मोकळे व्हावेत. रस्त्यावरील वाहतूक कोंडी दूर व्हावी, या हेतूने तत्कालीन नगराध्यक्षा सुजाता राजेमहाडिक यांच्या संकल्पनेतून राजवाडा येथे प्रतापसिंह महाराज फ्रूट मार्केट व भाजी मंडईची उभारणी करण्यात आली. या इमारतीचे बांधकाम करण्यासाठी तब्बल दोन कोटी खर्च झाले आहे. तळात प्रशस्त पार्किंग त्यावरच्या मजल्यावर भाजी विक्रेत्यांसाठी कट्टे व दुसऱ्या मजल्यावर फ्रूट मार्केट अशी रचना या इमारतीत आहे.दरम्यान, एवढा निधी खर्च करून उभारलेल्या या इमारतीचे सुमारे चार महिन्यांपूर्वी उद्घाटनही झाले. मात्र, अजूनही या मंडईचा वापर होताना दिसत नाही. पालिकेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये कट्टे वाटपाबाबत एकमत होत नसल्याचे कारण पुढे येत आहे. या मंडईत पूर्वी बसणाऱ्या विक्रेत्यांची नावे पालिकेकडे नोंदली गेली आहेत. त्या व्यतिरिक्त आणखी जवळच्या लोकांची सोय मंडईत करावी, यासाठी पालिकेतील एक गट आग्रही असल्याने हा विषय रखडला आहे. त्यातच विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने या मंडईतील कट्टे वाटपाचा ड्रॉ घेतला नाही. आता विधानसभा निवडणूक पार पडली आहे. आता ड्रॉ काढायला कोणती अडचण राहिलेली नाही, तरीही दिरंगाई सुरू आहे. त्यामुळे येथील विक्रेत्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या इमारतीत भाजी मंडईमध्ये १२३ कट्टे आहेत, तर फळविक्रीसाठी ४८ कट्टे आहेत. यापैकी ४८ विक्रेते पादचारी मार्गावरच फळविक्री करतात. त्यांचे या फ्रूटमार्केटमध्ये स्थलांतर झाल्यास फूटपाथ मोकळे होऊन नागरिकांची रस्त्याने चालण्याची सोय होईल. मात्र, पालिकेच्या दिरंगाईमुळे अनेक महिने हा विषय भिजत पडला आहे. (प्रतिनिधी)