शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

‘आॅक्टोबर हीट’ नव्हे; पाऊसच ‘हिट’

By admin | Updated: October 5, 2015 00:19 IST

धांदल उडूनही समाधान : सातारा शहरासह विविध ठिकाणी सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार; जिल्ह्यात भूजलस्तर वाढणार

सातारा : शहर व तालुक्यासह जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये परतीच्या पावसाने रविवारी सलग तिसऱ्या दिवशी दमदार हजेरी लावली. काही ठिकाणी पिकांचे नुकसान झाले असले, तरी भूजलपातळीत वाढ होणार असल्याने समाधानाचे वातावरण आहे. ‘आॅक्टोबर हीट’चे दिवस असताना सलग तीन दिवस संततधार पडणारा पाऊसच ‘हिट’ ठरला आहे. परतीला जाता-जाता सक्रिय झालेल्या मान्सूनने रविवारी सलग तिसऱ्या दिवशी सातारा शहरासह परिसराला झोडपून काढले. मुसळधार पावसामुळे शहरातील रस्ते पाण्याखाली गेले होते.सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. दुपारी एकच्या सुमारास ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली.ओढे-नाले भरून वाहिले तर रस्त्यावरही पाणी साचले होते. त्यामुळे वाहनचालकांना पाण्यातून मार्ग काढताना कसरत करावी लागली. रविवारी बाजाराचा दिवस असल्यामुळे जुना मोटार स्टॅण्ड येथील महात्मा गांधी भाजीमंडईत ग्राहक, विक्रेत्यांची गर्दी होती. रस्त्याकडेलाही किरकोळ विक्रेत्यांनी दुकाने थाटली होती. दुपारी अचानक सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे दुकानदारांसह ग्राहकांची त्रेधातिरपिट उडाली. रस्त्याकडेला बसलेल्या शेतकऱ्यांचा माल भिजल्यामुळे नुकसान झाले. रात्री उशिरापर्यंत पावसाची रिमझिम सुरूच होती. त्यामुळे बाजारपेठेत शुकशुकाट जाणवत होता. संततधार पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. शहराच्या पश्चिमेस डोंगरभागात जोरदार पाऊस पडत आहे. रविवारी सुटी असल्यामुळे कास पुष्प पठारावर हजारो पर्यटकांनी भेट दिली. मात्र, दुपारी एकपासूनच पावसाला सुरुवात झाल्यामुळे पर्यटकांना माघारी फिरावे लागले. (प्रतिनिधी) दुष्काळग्रस्तांसाठी माणगंगेला पान्हा!म्हसवड : माण तालुक्याची वरदायिनी असणाऱ्या मानगंगा नदी दुथडी भरून वाहू लागल्याने दुष्काळी बळीराजा सुखावला आहे. माण तालुक्यातील बहुतांशी गावात परतीच्या मान्सूनने हजेरी लावून कृपादृष्टी दाखवल्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे. यंदाच्या पावसाळ्यात पावसाने हजेरी न लावल्यामुळे येथील बळीराजा चिंतेत होता. त्यातच दुष्काळी परिस्थितीचा सामना येथील नागरिक करीत होते. १६ टँकरने तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाणीपुरवठा सुरू होता. मान्सून पूर्व पावसाने बऱ्यापैकी हजेरी लावल्याने माणदेशी बळीराजाने खरिपाच्या पेरण्या धूमधडाक्यात केल्या; परंतु नंतर पावसाने डोळे वटारल्यामुळे खरीप हंगामातील पिके पावसावाचून जळून गेली. जिथे पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असताना मात्र वरुणराजाने गत दोन दिवसांपासून परतीच्या मान्सूनच्या पावसाने दुष्काळी जनतेला दिलासा दिल्यामुळे ओढे, नाले, सिमेंट बंधारे तुडुंब भरले आहे. माण नदीला यावर्षी पहिल्यांदाच पाणी आल्याने समाधान व्यक्त होत आहे. यंदा शहरवासीयांनी गणेश विसर्जनाला माण नदी पात्रात पाणी नसल्याने इतरत्र विहिरी व तलावांचा शोध घेऊन पाणी जिथे आहे. तिथे गणेश विसर्जन करावे लागले होते.रविवारी सलग तिसऱ्या दिवशी पडलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकरीराजा आनंदित असून, यावर्षीचा खरीप हंगाम वाया गेला तर रब्बी हंगामातील पिके तरी पदरात पडतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)धोम-बलकवडीचा भराव खचलाआदर्की : फलटण तालुक्याच्या पश्चिम भागात आदर्की परिसराला एक तास मुसळधार पावसाने झोडपले. त्यामुळे बंधारे भरून वाहिले, तर आदर्कीच्या ओढ्याला पूर आला. पुराचे पाणी धोम-बलकवडी उजव्या कालव्यात मिसळल्याने कालव्यात पाणी मावले नाही. त्यामुळे कालव्याचा भराव खचला आहे. कापशी-हिंगणगाव, बिबी-कापशी, फलटण-सातारा रस्त्यांच्या फरशी पुलावरून पाणी वाहिल्याने वाहतूक ठप्प झाली. फलटणच्या पश्चिम भागात पावसाने दडी मारल्याने खरीप हंगाम वाया गेला होता. बाजरीची काढणी, मळणी सुरू असतानाच दुपारी दोन ते चार मुसळधार पावसाने हजेरी लावली. आदर्की ओढ्याचे पाणी कालव्यात शिरल्याने मातीच्या भरावावरून तीस फूट वाहून दहा फुटांचा भराव खचला. मात्र मायनर उघडल्याने कालवा फुटण्याचा अनर्थ टळला. मायणी भागात वीजपुरवठा खंडितमायणी : परिसरात रविवारी दुपारी बारा वाजता व सायंकाळी पाच वाजता विजांच्या गडगडासह जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे मायणी आठवडी बाजारातील व्यापारी, शेतकरी व ग्राहकांची मोठी धांदल उडाली. मायणीसह विखळे, हिवरवाडी, कन्हरवाडी, कानकात्रे, ढोकळवाडी, कलेढोण परिसरात दुपारी बारा वाजल्यापासून विजांच्या गडगडासह सुमारे एक तास जोरदार पाऊस झाला या पावसमुळे परिसरातील ओढे-नाले वाहू लागले तसेच परिसरातील पाझर तलाव, नालाबांध, सिमेंट बंधारे भरून वाहू लागले आहेत. मायणी, कानकात्रे, मुळीकवाडी, पाचवड, विखळे येथील तलावामधील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पुन्हा पावसाला सुरुवात झाली तेव्हापासून रात्री उशिरापर्यंत रिमझिम पाऊस सुरूच होता. दुपारी बारा वाजल्यापासून वीजपुरवठा खंडित झाला होता. सायंकाळी उशिरापर्यंत तो सुरळीत झाला नव्हता. आणखी काही दिवस परतीचा मान्सून असाच सुरू राहिल्यास परिसरातील तलाव पूर्ण क्षमतेने भरतील, अशी अशा आहे. (वार्ताहर)