शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

नाही करत मनुवादाचं गुणगाण; वाढविणार आंबेडकरांची शान !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 22:55 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककºहाड : ‘पंतप्रधान मोदी यांच्या सरकारमध्ये असलो तरी मी मनुवादींचा समर्थन करत नाही. मी अजिबात करीत नाही मनुवादींचं गुणगान, मला वाढवायची आहे आंबेडकर, अण्णाभाऊंची शान.. ज्या दिवशी दलितांच्या आरक्षणाला धक्का लावला जाईल, त्या दिवशी आम्ही हे सरकार खाली खेचू,’ अशी भूमिका केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी ...

लोकमत न्यूज नेटवर्ककºहाड : ‘पंतप्रधान मोदी यांच्या सरकारमध्ये असलो तरी मी मनुवादींचा समर्थन करत नाही. मी अजिबात करीत नाही मनुवादींचं गुणगान, मला वाढवायची आहे आंबेडकर, अण्णाभाऊंची शान.. ज्या दिवशी दलितांच्या आरक्षणाला धक्का लावला जाईल, त्या दिवशी आम्ही हे सरकार खाली खेचू,’ अशी भूमिका केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी स्पष्ट केले.येथील यशवंतराव चव्हाण स्मृतिसदनमध्ये दलित महासंघाच्या वतीने आयोजित मैत्री परिषदेत ते बोलत होते. यावेळी दलित महासंघाचे संस्थापक प्रा. डॉ. मच्छिंद्र सकटे, रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, ज्येष्ठ नेते किशोर तपासे, पुष्पलता सकटे, विजय यादव, ‘एमआयएम’चे जिल्हाध्यक्ष अल्ताफ शिकलगार, नगरसेविका माया भोसले, अमर गायकवाड, सादिकभाई शेख, रामभाऊ दाभाडे, भीमराव सावदकर, शरद गायकवाड उपस्थित होते.आठवले म्हणाले, ‘भारताचे संविधान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिले आहे. त्याला भाजपने बदलण्याची भूमिका मांडल्यास आम्ही सत्तेत राहणार नाही, त्यातून बाहेर पडू.’प्रा. डॉ. सकटे म्हणाले, ‘दलित महासंघाची ५ जुलै १९९२ मध्ये कोल्हापुरातील बिंदू चौकात स्थापना झाली. या संघाच्या माध्यमातून काम करताना खूप अनुभव आले. आज खºया अर्थाने चळवळ करायची असेल तर बाबासाहेबांच्या सुटाकडे, बुटाकडे न बघता त्यांच्या बोटाकडे बघून चळवळ करावी लागेल.’प्रकाश वायदंडे यांनी प्रास्ताविक केले. जावेद नायकवडी यांनी आभार मानले. कार्यक्रमास दलित महासंघातील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.आठवलेंच्या हाती दिली सकटेंनी कुºहाडआजच्या या मैत्री परिषदेत मंत्री रामदास आठवले यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत तर करण्यात आलेच. परंतु दलित महासंघाचे अध्यक्ष डॉ. मच्छिंद्र सकटे यांनी त्यांना कुºहाड भेट दिली. याची उपस्थितांमध्ये चर्चा होती.पंतप्रधानांचा नकोय ‘सूट’.. हवाय बाबासाहेबांचा ‘बूट’‘आम्हाला नकोय पंतप्रधान मोदी यांचा पंधरा लाखांचा सूट, हवाय डॉ. बाबासाहेबांचा बूट, हे प्रस्थापित करतायेत फाटाफूट, त्यासाठी हवी आहे आपल्यात एकजूट, उघडण्या मनोवाद्यांची मूठ, मैत्रीची हवी आहे एकत्र वज्रमूठ’ अशी कविता प्रा. डॉ. मच्छिंद्र सकटे यांनी मैत्री परिषदेत सादर केली. त्याला उपस्थितांनी भरभरून प्रतिसाद दिला.बहुजन शिक्षक परिवाराचे निवेदनदुर्गम भागांत काम करणाºया शिक्षकांना विशेष भत्ता करावा, प्रशासकीय टक्केवारीनुसार शिक्षकांच्या बदल्या व्हाव्यात, ४५ वयापुढील शिक्षकांना दुर्गम भागात पाठवू नये, दुर्गम भागात शाळांची संख्या वाढवावी, अशा विविध मागण्यांचे निवेदन बहुजन शिक्षक परिवाराच्या वतीने प्रवीण लादे यांनी मंत्री आठवले यांना यावेळी दिले.