शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमणांवर ‘मेहेरबानी’ नाही !

By admin | Updated: November 22, 2014 00:18 IST

सर्वसाधारण सभा : राजकारण, लागेबांधे, दबाव बाजूला ठेवून कारवाई करण्याची विरोधी पक्षनेत्यांची सूचना---सातारापालिका

सातारा : शहरातील बड्या धेंड्यांच्या अतिक्रमणांकडे कानाडोळा करून गरीब लोकांना रस्त्यावर आणले जात आहे, असा आरोप विरोधी पक्षासह सत्ताधारी नगरसेवकांनीही पालिकेच्या सभेत जाहीरपणे केला. अतिक्रमणांबाबत सत्ताधारी नगरसेवकांनीही आवाज उठविल्याने आता प्रशासनाची ‘चिंता’ मिटल्याचे चित्र निर्माण झाले आहे.सातारा पालिकेची सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष सचिन सारस यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या कालावधीनंतर शुक्रवारी पालिकेच्या छ. शिवाजी सभागृहात पार पडली. सभेच्या सुरुवातीला नगरसेवक रवींद्र पवार यांनी फुटका तलावाशेजारच्या अतिक्रमणाबाबतचा मुद्दा उपस्थित केला. पवार म्हणाले, ‘फुटका तलावाशेजारची पालिकेच्या जागेत चंद्रशेखर चोरगे यांनी अनधिकृत बांधकाम केले आहे. याबाबत आम्ही अनेकदा आंदोलन केले. हा विषय हायकोर्टात प्रलंबित असल्याचे कारण गेल्या वीस ते बावीस वर्षांपासून पालिका प्रशासन पुढे करत आहे. वास्तविक, उच्च न्यायालयाने हे अतिक्रमण पाडण्याचे आदेश दिले असतानाही ‘कुठल्यातरी’ भीतीमुळे त्यावर कारवाई केली जात नाही. याबाबत एक तर प्रशासन कमी पडतेय, अथवा पालिका अधिकारी संबंधितांना सामील असावेत.’विरोधी पक्षनेते अ‍ॅड. बाळासाहेब बाबर यांनी मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणे काढली जात नसून लागेबांधे, राजकारण बाजूला ठेवून कारवाई करण्याची मागणी केली. नगरसेवक जयेंद्र चव्हाण यांनीही नियोजन, अतिक्रमण व स्थावर जिंदगी या तीन विभागांकडून कारवाईबाबत एकमेकांकडे बोटे दाखविली जात असल्याचा आरोप केला. सभेने २८ पैकी २६ विषयांना मंजुरी दिली. रस्त्यांच्या प्रकल्प अहवालाला विरोधी पक्षाने विरोध केला. (प्रतिनिधी)लेखापाल जाधव बनले मुख्याधिकारीमुख्याधिकारी अभिजित बापट हे पालिकेच्या कामानिमित्त मुंबईला गेले होते. त्यांच्या अनुपस्थितीत सभेचे कामकाज करता येणार नसल्याचे विरोधी पक्षनेते अ‍ॅड. बाळासाहेब बाबर यांनी स्पष्ट केले. ‘कायदा तुम्ही किंवा मी बनविला नाही. मुख्याधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत उपमुख्याधिकाऱ्यांना सभेला उपस्थित राहणे आवश्यक होते; परंतु तेही उपस्थित नाहीत. यावर मुख्याधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमध्ये लेखापाल हेमंत जाधव हे सभेचे कामकाज संभाळतील,’ असे स्पष्टीकरण नगराध्यक्ष सचिन सारस यांनी केले.कोण काय म्हणाले?नगरसेवकांच्या वॉर्ड निधीचं काय नियोजन केलंय : अलका लोखंडेविकास कराच्या रूपाने नागरिकांची पिळवणूक : अशोक मोनेबांधकाम व्यावसायिकांकडून शहरातील गटारांचे नुकसान : जयेंद्र चव्हाणगटारांची कामे ‘क्वालिटी’ची करा : अशोक मोनेआधुनिक दिव्यांनी होऊ शकते वीज बचत : प्रवीण पाटीलअडीच कोटी खर्चूनही शहरात अस्वच्छता : अ‍ॅड. बाळासाहेब बाबर