शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

दवाखाना परिसरातीलच सांडपाण्याचा निचरा होईना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:37 IST

वडूज : तालुक्याची राजधानी असलेल्या वडूज शहरातील दिशाहीन गटारे असल्याकारणाने दैनंदिन वाहणारे सांडपाणी रस्त्यावर येत आहे. त्यामुळे या परिसरातील ...

वडूज : तालुक्याची राजधानी असलेल्या वडूज शहरातील दिशाहीन गटारे असल्याकारणाने दैनंदिन वाहणारे सांडपाणी रस्त्यावर येत आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तर दवाखाने परिसरातीलच सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने दवाखान्यातील गरोदरपणात दाखल झालेल्या माता आणि बाळ यांचे आरोग्य ‘राम भरोसे’ ठरत आहे.

वडूज ग्रामपंचायतीची नगरपंचायत होऊन तब्बल चार वर्षे लोटली तरी आरोग्याच्या दृष्टीने गंभीर असलेल्या या सांडपाण्याचा निचरा होत नाही. ही बाब आरोग्याच्या दृष्टीने फार गंभीर असून खेदजनकही आहे. या प्रभागातील नगरसेवक आणि नगरपंचायत प्रशासन यांच्यात ताळमेळच नसल्याचे यानिमित्ताने स्पष्ट होत आहे. या प्रभागातील नेतेमंडळीही सोयीस्करपणे या गंभीर विषयावर टाळाटाळ करीत असल्याचे स्पष्ट होत आहे. सध्या कोरोना महामारीचा उद्रेक होत असताना या बाबीकडे देखील नगरपंचायत प्रशासनाकडून डोळेझाक का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. मूळ जागा मालक व सद्यस्थितीतील प्लाॅटधारक यांच्यात प्रसंगी वादविवादही झालेलेच आहेत. या परिसरातील सांडपाणी हे नैसर्गिक वाहत्या बाजूने होणे क्रमप्राप्त असताना संबंधितांकडून दुर्लक्ष केले जात आहे. या परिसरातील नागरिकांचे आरोग्य कायम धोक्यात असलेतरी त्यांची अवस्था ‘इकडे आड आणि तिकडे विहीर’ अशीच‌ झाली आहे. या संदर्भात वेळोवेळी नागरिकांनी तोंडी आणि लेखी तक्रारी केल्या आहेत. मात्र, निद्रीत अवस्थेत असलेल्या नगरपंचायत प्रशासनालाही जाग तरी कधी येणार याकडे सोशिक नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.

कोट :

या सांडपाण्याचा निचरा होणे आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असताना जाणीवपूर्वक नगरपंचायत प्रशासन टाळाटाळ करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. हा प्रश्न मार्गी लागला नाही तर जन आंदोलन उभारून न्याय मागू.

चेतन गोडसे, वडूज

कोट :

मूळ जागा मालक व नगरपंचायत प्रशासन यांची वेळोवेळी या गटार व्यवस्थेबाबत चर्चा झाली होती. मात्र, समन्वयाची भूमिका या‌ विषयी असणे आवश्यक आहे. लवकरच हा प्रश्न सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध आहे.

शशिकांत पाटोळे, माजी उपसरपंच वडूज

फोटो ओळ : वडूज शहरातील दवाखाना परिसरातच साचलेले सांडपाणी.