शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

फोटोसेशन नको, हवाय मदतीचा हात

By admin | Updated: January 8, 2016 00:47 IST

असंवेदनशीलतेचे दर्शन : अपघाताचे चित्रण सोशलमीडियावर ‘पोस्ट’ करण्याचे फॅड

सातारा : सध्याच्या धावपळीच्या युगात माणूस एवढा व्यस्त झाला आहे की, आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांकडे सजगतेने पाहायलाही कोणाकडे वेळ नाही. तंत्रज्ञानाच्या या जमान्यात माणूसही यंत्राप्रमाणं भावनाशून्य बनत चालला आहे. माणसाची संवेदनशीलता हरवून गेलीय की काय याचा प्रत्यय रस्त्यावर घडणाऱ्या अपघातावेळी नेहमीच येतो. अपघातातील जखमी रस्त्यावर असह्य वेदनेनं तडफडत असताना त्याला मदत करण्यापेक्षा अपघातग्रस्त वाहनाचे फोटा मोबाईलमध्ये काढण्यात माणसं मश्गुल दिसतात. अशा वेळी मोबाईलमध्ये गुंतलेल्या हातांपेक्षा जखमीला वाचविण्यासाठी मदत करणारे हात पुढे यायला हवेत, अशीच भावना व्यक्त होत आहे.पुणे-राष्ट्रीय महामार्गावर रोज अपघात घडतात. कुणी जखमी होतो तर कुणाचा बळी जातो. जखमीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यानंतर डॉक्टर सांगतात की, थोडे लवकर आला असता तर कदाचित रुग्ण वाचला असता. अपघातातील जखमीला वेळेवर उपचार मिळणे गरजेचे असते. मात्र पोलिसांचा ससेमिरा पाठीमागे लागेल या भीतीने जमलेल्या गर्दीतून तफडफणाऱ्या जखमीला मदत करण्यास हात पुढे येत नाहीत. जखमींना उचलून रुग्णालयात नेले आणि काही बरेवाईट घडले तर पोलिसांचा ससेमिरा पाठीमागे लागेल. त्यामुळे उगीच अशा फंदात न पडलेले बरे, असाच विचार लोक करतात. पण वेळेत उपचार मिळाल्यास चांगले घडू शकते, याचाही विचार व्हावा. (प्रतिनिधी)सोशलमीडियावर अपघाताचे चित्रणरस्त्यावर अपघात घडल्यानंतर लगेचच बघ्याची गर्दी जमते. मात्र, जखमींना मदत करण्यासाठी सरसावणारा हात एखादाच; पण मोबाईलवर अपघाताचे चित्रण करणारे हातच जास्त पाहायला मिळतात. बुधवारी कृष्णा पुलानजीक झालेल्या अपघातातवेळी हेच पाहायला मिळाले. जो-तो खिशातील मोबाईल काढून अपघातग्रस्त कार, उलटलेला ट्रक, चिरडलेली दुचाकी यांचेच फोटो काढण्यात व्यस्त दिसत होता. चार दिवसांपूर्वी महामार्गावर झालेल्या अपघातात दोन बहिणींना जीव गमवावा लागला. घटना घडल्यानंतर काही वेळातच अपघाताचे फोटो सोशलमिडियावर झळकू लागले. काही तासांनंतर त्या अपघाताची व्हिडिओ क्लिपही दिसू लागली. आजचीजबाबदारीचं भान हवं...काळीज पिळवटून टाकणाऱ्या अशा घटनांचे चित्रण करणं, त्याचे छायाचित्र काढणं आणि ते सोशलमिडियावर प्रसारित करणं, यामागील हेतू ‘माहिती देणं’ हा असला तरी अपघातातील जखमींना मदत करण्याची जबाबदारीही आता स्वीकारायला हवी. माणसानं माणसाची मदत नाही करायची तर कोणाची करायची? केवळ आधुनिकता न मिरविता आपल्यातलं माणूसपण जिवंत ठेवून सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे, अशी भावना ज्येष्ठ नागरिकांमधून व्यक्त होत आहे.