शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
2
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
3
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
4
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
5
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
6
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
8
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
9
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
10
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
11
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
12
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
13
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
14
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
15
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
16
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
17
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
18
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
20
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक

फलटणमध्ये ‘नो पार्किंग’ झोन

By admin | Updated: July 28, 2015 21:28 IST

पोलीस अधीक्षकांची सूचना : मुख्य रस्त्यांवर सम-विषम तारखांत गाड्या उभारणार--लोकमत इफेक्ट

फलटण : फलटण शहरातील वाहतूक कोंडी आणि पार्किंगबाबत ‘लोकमत’ने वारंवार उठविलेल्या आवाजाची दखल घेतली आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शहरात पार्किंग-नो पार्किंगबाबतची अधिसूचना अखेर पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी जारी केल्याने शहरवासीयांमध्ये समाधान पसरले आहे. ‘लोकमत’वृत्ताचे कौतुक होत आहे.फलटण शहरात बोकाळलेल्या अतिक्रमणामुळे वारंवार वाहतूक कोंडीला जनतेला सामोरे जावे लागत होते. शहरातील मुख्य रस्त्यांवर वाहतूक कोंडी नित्याची बाब बनली होती. वाहतूक कोंडी व रस्त्यांवर अतिक्रमणामुळे होणाऱ्या जनतेच्या विशेषत: वाहनचालकांच्या समस्यांचा पाडाच ‘लोकमत’ने सोमवार, दि. २७ जुलैच्या अंकात वाचला होता. ‘फलटणच्या रस्त्यांना अतिक्रमणांचा विळखा पालिका व पोलिसांचे दुर्लक्ष’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केला होता. तसेच यापूर्वीही शहरातील पार्किंगबाबत ठोस उपाययोजना करण्याबाबत ‘नो पार्किंग’ झोन करण्याबाबत वारंवार ‘लोकमत’च्या माध्यमातून आवाज उठविण्यात आल्यामुळे अखेर या वृत्तांची दखल नगरपालिका व खुद्द जिल्हा पोलीस प्रमुखांनी घेत वाहतुकीची होणारी कोंडी टाळण्यासाठी अधिनियम १९८८ (१९८८चा ५९) याच्या कलम ११६ (१) (अ)नुसार अधिसूचना काढली आहे. शहरात काही भागात सम-विषम नो पार्किंग झोन करण्यात आले आहे. पार्किंगबाबत नियम केल्यामुळे काही अंशी रस्त्यापुढील वाहतुकीची कोंडी कमी होणार आहे. तरी अतिक्रमणाबाबत व शहरातील हातगाड्याबाबत आता नगरपालिकेला ठोस कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे. शहराला प्रचंड अतिक्रमाणांचा विळखा बसला असून, नगरपालिका लक्ष देत नसल्याने उठसूठ कोणीही अतिक्रमणे करू लागला. या सर्व गोष्टींचा परिणाम रस्ते अरुंद होऊन वाहतुकीची कोंडी होण्याबाबत झाला आहे. पोलिसांनी पार्किंगबाबत अधिसूचना काढल्याने आता नगरपालिकेलाही काहीतरी करून दाखविण्याची वेळ आली आहे. (प्रतिनिधी)