शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

कोसळणाऱ्या दरडीचं कोणालाच नाही दु:ख!

By admin | Updated: August 1, 2014 23:22 IST

पसरणी घाट : प्रवासी तीन तास अडकून पडले; पण मदत पोहोचेना

बावधन : अंगाचा थरकाप उडणाऱ्या माळीण येथील भीषण दुर्घटनेनंतर डोंगर पायथ्याला राहणाऱ्या नागरिकांचा व डोंगर घाटातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या जीविताचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गेल्या काही दिवसांत घाटातून दरड कोसळू लागल्याने वाहनधारक व प्रवासी जीव मुठीत घेऊन प्रवास करीत आहेत. पसरणी घाटातही गेले काही दिवसांत दोनदा दरड कोसळल्याचे प्रकार घडले आहेत. ही नैसर्गिक आपत्ती असली तरी त्यावर उपाययोजना करण्यास वाईची सार्वजनिक बांधकाम विभाग सपशेल अपशयी ठरल्याचे गुरुवारच्या घटनेवरून स्पष्ट झाले आहे. सुरूर-पोलादपूर राज्य महामार्ग असलेल्या या रस्त्यावर वर्षभर वाहनाची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. अवघड वळणे असलेल्या पसरणी घाटातून हा रस्ता जातो. घरात एका बाजूला डोंगर कडा तर दुसऱ्या बाजूला खोल दऱ्या, अशा अवघड घाटातून प्रवास करणे म्हणजे वाहनधारकाची कसरत होते. सुमारे दहा किलोमीटर घाटात आवश्यक त्या उपाययोजना न झाल्याने यापूर्वी घाटात अनेक अपघात घडले आहेत. २००४ मध्ये तर खासगी बस दरीत कोसळून एकवीसजण ठार झाले होते. यानंतर बांधकाम विभागाने रस्त्यावर रिफ्लेक्टर व संरक्षक कठडे बांधले. परंतु सुरक्षिततेच्या दृष्टीने म्हणाव्या तितक्या उपाययोजना न झाल्याचे नंतर घडलेल्या अनेक अपघातावरून स्पष्ट झाले आहे. दरवर्षी पावसाळ्यात पसरणी घाटात कुठे ना कुठे दरड कोसळण्याचे प्रकार घडत असतात; परंतु सुदैवाने यामध्ये कसलीही दुर्घटना नसल्याचे बांधकाम विभागाने याकडे फारसे गांभीर्याने पाहिले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दरड कोसळल्यानंतर काही वेळातच या बाबतची कल्पना घाटात अडकलेल्या वाईतील प्रवाशांनी बांधकाम अधिकाऱ्याला दिले होते; परंतु हे कार्यालय साताऱ्यात आल्याचे सांगत माझी माणसे जेसीबी घेऊन घाटात लगेच पाठवतो, असे सांगताच सव्वातीन वाजले होते. यानंतर वारंवार प्रवासी व पोलिसांनी संपर्क साधून तत्काळ जेसीबी पाठविण्याची विनंती केली. काही वेळातच जेसीबी घटनास्थळी पोहोचला तोपर्यंत घाटात अडकून पडलेल्या पर्यटक व स्थानिक प्रवाशांनी संतप्त होत बांधकाम विभागाच्या कारभारावर अक्षरश: शिव्यांची लाखोली वाहिली. अडकून पडलेली शाळकरी मुले अक्षरश: चार-पाच किमी पायी चालत आली. (प्रतिनिधी)बांधकाम विभागासाठी मोठा धडानैसर्गिक आपत्ती कधीही सांगून येत नसली तरी त्यामुळे होणाऱ्या दुर्घटना मात्र शक्य तितक्या टाळणे संबंधित यंत्रणेच्या हातात असते. बांधकाम विभागने अगोदरच संभाव्य धोके लक्षात घेऊन खचलेले दगड बाजूला करण्याची आवश्यकता होती. शिवाय वाहतूक ठप्प होऊनही यासाठी घाटात पावसाळ्यात तरी एक जेसीबी सज्ज ठेवण्याची आवश्यकता होती. परंतु यापैकी काहीच काम विभागाचे दिसून आले. यापुढे तरी अधिकाऱ्यांनी घडलेल्या घटनेतून बोध घेऊन तत्काळ उपाययोजना कराव्यात, अन्यथा नागरिकांच्या रोषाला सामोरे जाण्याची वेळ अधिकाऱ्यांना येऊ शकते.