शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

नको देवराया... अंत आता पाहू !

By admin | Updated: July 11, 2014 00:40 IST

मेंढच्या ज्योतिर्लिंगाला साकडे : दिवस तोच; मात्र परिस्थितीत दोन टोकांचं अंतर

रवींद्र माने- ढेबेवाडी , वर्षापूर्वीचा आठवतो तो जुलै महिना... मुसळधार कोसळणारा तो संततधार पाऊस, एकीकडे तुडुंब भरलेलं वांगचं धरण, तर दुसरीकडे प्रकल्पग्रस्तांचे मरण. गावातील काही घरात पाणी घुसलेलं तर काही धरणांना पाण्याचा वेढा, अशा अडचणीच्या वेळी आपला पाठीराखा ग्रामदैवताला हाक मारावी तर तोही पाण्यात; पण तरी सुध्दा मोठ्या हिमतीने पाण्यातून मार्ग काढत ‘नको देवराया अंत आता पाहू’ अशी विनवणी करणाऱ्या पाटण तालुक्यातील मेंढ गावच्या ग्रामस्थांवर यावर्षी मात्र ‘येरे येरे पावसा’ म्हणत ज्योतिर्लिंगाला साकडे घालण्याची वेळ आली आहे़ ढेबेवाडीपासून पश्चिमेला सुमारे सात किलोमीटरअंतरावर मराठवाडी नजीक वांग नदीवर तीन टीएमसी पाणीसाठ्याचा मध्यम धरण प्रकल्प उभारण्यात आला आहे़ या प्रकल्पामध्ये मेंढ, उमरकांचन, घोटील रेठरेकरवाडी, मराठवाडी, जिंती व काही वाड्या-वस्त्यांमधील सुमारे १८०० कुटुंबे विस्थापित होत आहेत़ यापैकी काही गावांतील कु टुंबांचे स्थलांतर सातारा, सांगली जिल्ह्यांत करण्यात आले आहे़ ‘आधी पुनर्वसन मगच धरण,’ असा कायदा असताना सुद्धा शासनाने कायदाच पायदळी तुडवत प्रकल्पग्रस्तांची पुनर्वसन प्रक्रि या पूर्ण होण्यापूर्वीच गतवर्षी धरणात पाणीसाठा केला़ येथील संबंधित अधिकाऱ्यांना पाणीसाठ्याचा अंदाजच आला नाही़ त्यातच संततधार कोसळणारा पाऊस यामुळे धरणात जुलै महिन्यातच क्षमतेपेक्षा जास्त पाणीसाठा झाला़ परिणामी मेंढ आणि उमरकांचन येथील काही घरांमध्ये पाणी घुसले होते़ पिण्याच्या पाण्याच्या विहिरी, सार्वजनिक मंदिरे पाण्याखाली गेली, यामुळे प्रकल्पग्रस्तांच्या संयमाचा बांधही फुटला होता़; पण निसर्गापुढे पुरते अपयशी ठरलेल्या प्रशासनाने मात्र येथील प्रकल्पग्रस्तांना अखंडपणे आठ दिवस पहारा दिला होता़ पाऊस कोसळतच होता़ बघता-बघता मेंढ येथील मंदिराला पाण्याचा वेढा पडला़ पाऊस थांबावा म्हणून येथील ग्रामस्थ दररोज प्रार्थना करत होते़; पण आता हे श्रद्धास्थानच पाण्याखाली जाऊ लागले होते़ तरीसुद्धा पाण्यातून मार्ग काढत पाण्यात बुडलेल्या आपल्या पाठीराख्याकडे जाऊन ‘नको देवराया अंत आता पाहू,’ अशी विनवणी करत होते़ मात्र, यावर्षी पावसाने हुलकावणी दिल्याने जुलै महिना कोरडाच पडला आहे़ येथील शेतकऱ्यांनी नेहमीप्रमाणे पाऊस पडेल, या आशेने संपूर्ण खरिपाच्या पेरण्या केल्या़ पीकही उगवून आली़; पण आता पावसाने दडी मारली ना नदीला, पाणी ना धरणात पाणी, पीक जगवायची कशी, या विवंचनेत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले असून, आता ‘येरे येरे पावसा’ अशी साद घालताना येथील प्रकल्पग्रस्त शेतकरी दिसत आहेत़