शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

मनपा पश्चिम कार्यालय; घरपट्टी विभाग सुविधांविना

By admin | Updated: June 15, 2016 00:09 IST

एकच संगणक : अप्रशिक्षित कर्मचाऱ्यांचा भरणा

 नाशिक : महापालिकेच्या पश्चिम विभागीय कार्यालयातील घरपट्टी विभागात नव्यानेच बदलून आलेले कर्मचारी प्रशिक्षित नसल्याने वसुली संथगतीने सुरू आहे, शिवाय १८ कर्मचारी असूनही विभागात केवळ एकच संगणक पुरविण्यात आला आहे. स्मार्ट नाशिकसाठी अत्याधुनिक मोबाइल अ‍ॅपसह संगणकीय तंत्रज्ञानावर भर देणाऱ्या आयुक्तांकडून महसूल वसूल करणाऱ्या विभागातील अत्याधुनिकीकरणाकडे दुर्लक्ष होत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. महापालिकेच्या सहाही विभागीय कार्यालयांपैकी पश्चिम विभाग हा उच्चभू्र वस्तीचा असल्याने याठिकाणी महापालिकेला महसूल मोठ्या प्रमाणावर प्राप्त होत असतो. मनपा प्रशासनाने गेल्या काही महिन्यांत कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्याने पश्चिम विभागीय कार्यालयातही नव्याने बदलून आलेले कर्मचारी रुजू झाले आहेत. परंतु, या कर्मचाऱ्यांना विभागीय कार्यालयाकडून वसुलीसंबंधी कसलेही प्रशिक्षण देण्यात आलेले नाही अथवा जुन्या कर्मचाऱ्यांकडून त्याबाबतची माहिती पुरविण्यात आलेली नाही. त्यामुळे नवख्या व अप्रशिक्षित कर्मचाऱ्यांमुळे घरपट्टी वसुलीचा वेगही मंदावला आहे. कर्मचारी प्रशिक्षित नसल्याने कामकाजालाही विलंब लागतो. त्यामुळे घरपट्टी भरणा करण्यास येणाऱ्या ग्राहकांची गैरसोय होत असते. घरपट्टी विभागात १८ कर्मचारी कार्यरत असून, विभागात केवळ एकच संगणक पुरविण्यात आला आहे. पंडित कॉलनीतील बिल भरणा केंद्रात मोठ्या प्रमाणावर ग्राहकांची गर्दी असते; परंतु एकच संगणकामुळे कामकाजास विलंब होत असतो. त्यातच जुन्या जमान्याचा प्रिंटर व अन्य सोयी उपलब्ध करून दिल्यानेही कामकाजात अडथळे निर्माण होत असतात. महापालिका आयुक्तांनी सदर विभागाकडे जातीने लक्ष घालून कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षणवर्ग घ्यावे आणि आवश्यक साधनसामग्री पुरवावी, जेणेकरून ग्राहकांचा वेळ वाया जाणार नाही, अशा प्रतिक्रिया ग्राहकांमधून ऐकायला मिळत आहेत. (प्रतिनिधी)