शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

नितीन गडकरींसह मान्यवर आज कऱ्हाडात

By admin | Updated: March 25, 2016 23:32 IST

कृष्णा विद्यापीठात दीक्षांत सोहळा : ४२६ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान होणार

कऱ्हाड : येथील कृष्णा वैद्यकीय विज्ञान अभिमत विद्यापीठाचा पाचवा दीक्षांत सोहळा दि. २६ मार्च रोजी सकाळी दहा वाजता विद्यापीठाच्या प्रांगणात आयोजित केला आहे. यास प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय रस्तेवाहतूक आणि जहाजमंत्री नितीन गडकरी, सहकारमंत्री चंद्रकांत पाटील, कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थान विद्यापीठाचे कुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा भूषविणार असल्याची माहिती विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे आणि परीक्षा नियंत्रक डॉ. आर. के. गावकर यांनी दिली.कृष्णा अभिमत विद्यापीठात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. डॉ. घोरपडे म्हणाले, ‘शनिवारी आयोजित करण्यात येणाऱ्या दीक्षांत समारोहाला कृष्णा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ए. व्ही. नाडकर्णी, आरोग्यविज्ञान संचालक डॉ. आर. के. अयाचित आदी मान्यवरांसह व्यवस्थापन मंडळाचे सदस्य आणि अभ्यास मंडळाचे सदस्य उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यात विद्यापीठाच्या विविध अधिविभागातील ४२६ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करून सन्मानित करण्यात येणार आहे.’कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या कृष्णा वैद्यकीय विज्ञान संस्थेची स्थापना ग्रामीण भागातील जनतेला मोफत व माफक दरात उच्च दर्जाच्या वैद्यकीय सुविधा मिळाव्यात आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आरोग्य शिक्षण मिळावे, या उद्देशाने करण्यात आली.दिवंगत जयवंतराव भोसले यांची दूरदृष्टी आत्मसात केलेल्या डॉ. सुरेश भोसले यांची प्रथम कृष्णा वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या अभिमत विद्यापीठाच्या कुलगुरूपदी निवड करण्यात आली. या दीक्षांत समारंभात ४२६ विद्यार्थी-विद्यार्थिनींना पदवी प्रदान करून सन्मानित करण्यात येणार आहे. विशेष गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांना पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)