शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

नव्वद टक्क्यांना कळले; आता उरले दहा टक्के; नागरिकांकडून कचऱ्याचे नियमित वर्गीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 22:38 IST

सचिन काकडे। लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : कचºयाचे योग्य निर्मूलन करता यावे, यासाठी सातारा पालिकेच्या वतीने कचºयाचे वर्गीकरण केले ...

सचिन काकडे।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : कचºयाचे योग्य निर्मूलन करता यावे, यासाठी सातारा पालिकेच्या वतीने कचºयाचे वर्गीकरण केले जात आहे. घंटागाड्यांच्या माध्यमातून कचरा संकलित करताना तो ओला व सुका अशी वर्गवारी करूनच गोळा केला जात आहे. शहरातील जवळपास ९० टक्के नागरिक कचºयाचे वर्गीकरण करीत असून, केवळ दहा टक्के नागरिक याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे समोर आले आहे. या नागरिकांचे प्रबोधन झाल्यास पालिकेचे कचरा वर्गीकरणाचे उद्दिष्ट साध्य होणार आहे.सातारा शहरात जवळपास ३५ हजार मिळकतधारक आहे. शहरातून दररोज सुमारे ७० टक्के कचरा हा घंडागाड्या व टीपरच्या माध्यमातून संकलित केला जातो. या कचºयाची सोनगाव कचरा डेपोत विल्हेवाट लावली जाते. पूर्वी कचºयाचे वर्गीकरण न करताच तो गोळा केला जात होता. मात्र, स्वच्छ सर्वेक्षण अभियानात सहभागी झाल्यानंतर पालिकेने कचरा निर्मूलनासाठी ठोस पावले उचलली.याचाच एक भाग म्हणून प्रथम कचºयाची ओला व सुका अशी वर्गवारी करण्यात आली. घंटागाड्यांच्या माध्यमातून कचरा संकलित करताना तो वर्गीकरण करूनच गोळा केला जाऊलागला.यासाठी पालिकेच्या वतीने नागरिकांचे विविध माध्यमातून प्रबोधन करण्यात आले. शहरातील जवळपास ९० टक्के नागरिक आता ओला व सुका असे वर्गीकरण करूनच घंटागाडीत कचरा टाकतात. परंतु केवळ दहा टक्के नागरिक आजही कचºयाचे वर्गीकरण करीत नाहीत.एकाच पिशवीत ओला व सुका कचरा टाकून कर्मचाºयांच्या डोळ्यात धूळफेक करण्याचे काम काहीजणांकडून सुरू आहे. या मूठभर नागरिकांची मानसिकता बदलण्यासाठी प्रबोधनाची गरज निर्माण झाली आहे.पालिकेकडून याबाबत उपाययोजना केल्यास पालिका कचरा वर्गीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करेल, असे मत नागरिकांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.कचरा डेपोत खोदले खड्डेसातारा शहरातून दररोज सुमारे ६० ते ७० टन कचरा संकलित केला जातो. सोनगाव डेपोत हा कचºयाची विल्हेवाट लावली जाती. या ठिकाणी पालिकेच्या वतीने घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले आहे. या प्रकल्पाचे काम सुरू असून, याचाच एक भाग म्हणून डेपोत सहा मोठ्या आकाराचे खड्डे खणण्यात आले आहेत. शहरातून दररोज गोळा होणारा कचºयाचे वर्गीकरण करून तो या खड्ड्यांमध्ये टाकला जाणार आहे.