शहरं
Join us  
Trending Stories
1
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! 10 कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
2
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
3
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
4
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
5
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
6
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक
7
तुकोबांच्या अभंगातून उत्तर देत धनंजय पोवारनं मटण खाण्यावरुन ट्रोल करणाऱ्यांचं केलं प्रबोधन, म्हणाला "सज्जन कसायाबरोबर मांस विकु लागला..."
8
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
9
जुलैची सुरुवात ठरणार खास, ९ राशींना भरघोस लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, शुभ-कल्याणकारक काळ!
10
शेअर बाजारात घसरण, सबस्क्रायबर्सही होताहेत कमी; तरीही वाढतोय Vodafone Idea चा शेअर, कारण काय? 
11
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात
12
नेटफ्लिक्सचा 'स्क्विड गेम 3' सुपरहिट की फ्लॉप? प्रेक्षकांच्या नाराजीमुळे शेअर बाजारात हाहाकार!
13
July Born Astro: कसा ओळखावा जुलैमधल्या लोकांचा स्वभाव? ब्रह्मदेवालाही कळणे कठीण; वाचा गुण-दोष!
14
टॉप अधिकाऱ्यांनी सोडली नोकरी; २०० रुपयांच्या खाली आला दिग्गज बँकेचा शेअर, प्रकरण काय?
15
तरुणीने भेटायला हॉटेलमध्ये बोलावलं, आनंदाने गेला तरुण; पण पुढे जे झालं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
16
पोलिसांनी गाडी अडवल्याने संतापले, ताजमहालजवळ केला गोळीबार; पर्यटकांमध्ये उडाली खळबळ!
17
Astro Tips: मिठाची पुडी जवळ ठेवा, भीती, नैराश्य, नकारात्मक ऊर्जा घालवा; उपाय सविस्तर वाचा!
18
१८ एकर जमिनीवर कब्जा करण्याचा डाव फसला; प्रियकरासोबत मिळून पतीला मधुचंद्राच्या रात्रीचं संपवलं, मग...
19
मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं
20
'पंचायत'मध्ये सचिव जी अन् रिंकीचा असणार होता किसींग सीन, सानविकाने दिला नकार

नव्वद टक्के बटाट्याचे बियाणे बोगस

By admin | Updated: November 27, 2014 00:24 IST

पुसेगावात खळबळ : बाजारपेठेतून विक्री झालेल्या बियाण्याची तज्ज्ञांकडून पाहणी

पुसेगाव : पुसेगाव, ता. खटाव येथील बटाटा बाजारपेठेतून खरेदी केलेले ४२ क्विंटल एटीएल बटाटा बियाणे नव्वद टक्के बोगस असल्याची प्राथमिक माहिती तपासणीसाठी आलेल्या कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी व कृषी संशोधन केंद्राच्या तज्ज्ञांनी दिली आहे. या झाडांचे बटाटे अधिक तपासणीसाठी राजगुरूनगर येथील कृषी संशोधन केंद्रात पाठविण्यात येणार आहे.पुसेगाव येथील जाधव ट्रेडिंग कंपनी यांच्याकडून खरीप हंगामात सुमारे नऊ ट्रक बटाट्याचे बोगस बियाणे विक्री झाल्याची माहिती पुढे येत आहे. खरेदी केलेले ४२ क्विंटल एटीएल बटाटा बियाणे बोगस असल्याची तक्रार निकम यांनी पंचायत समिती (वडूज)कडे केली आहे. त्यानुसार बुधवारी (दि. २६) दुपारी तीन वाजता विभागीय कृषी अधिकारी व तंत्रज्ञ ए. जी. पाटील, बोरगाव कृषी तंत्रविज्ञानचे तंत्रज्ञ बी. एम. यादगीरवाड, खटाव तालुका पंचायत समितीचे कृषी अधिकारी बोडरे, मंडल कृषी अधिकारी देशमुख यांनी काटकरवाडी येथे जाऊन निकम यांच्या बटाटा शेताची पाहणी केली. यावेळी पुसेगाव, फडतरवाडी, दिवडी, काटकरवाडी, कटगुण, विसापूर, गारवडी या भागातील सुमारे ३५ शेतकरी हजर होते. त्यांनीही या बोगस बटाटा बियाण्यासंदर्भात अधिकाऱ्यांपुढे आपले गाऱ्हाणे मांडले.या पाहणीनंतर नव्वद टक्के बटाटा बियाणे बोेगस असल्याचा प्राथमिक अंदाज या पथकाने व्यक्त केला. हा अहवाल व बटाटा तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे. (वार्ताहर)उगवण क्षमतेवर परिणामपुसेगाव, फडतरवाडी, दिवडी, काटकरवाडी, कटगुण, विसापूर, गारवडी या भागांतील अनेक शेतकऱ्यांनी एटीएल जातीचे बटाटा बियाणे खरीप हंगामात खरेदी केले. बटाटा लावल्यानंतर त्याची उगवण क्षमता केवळ सत्तर टक्के इतकीच राहिली. नेहमीप्रमाणे औषधांचा व खतांचा योग्य वापर व पाण्याचे योग्य व्यवस्थापन करूनदेखील बटाटा पिकाची वाढ झाली नाही. तसेच काढणीच्या वेळीही झाडाला नाममात्र बटाटे लागलेले पाहावयास मिळाले.मी देखील शेतकऱ्याचाच मुलगा आहे. मला शेतकऱ्यांच्या दु:खाची जाणीव आहे. बोगस बटाटा बियण्यांची विक्री कधीही केली नाही. जर असे असेल तर संबंधित शेतकऱ्यांनी हे सिद्ध करुन दाखवावे- वैभव जाधव(मालक, जाधव ड्रेडिंग कंपनी)निकम यांच्या शेतात बटाटा पिकाचा पंचनामा करून अहवाल तयार केला आहे. ९० % बटाटा बियाणे बोगस असून, मार्केटमध्ये न चालणारे आहे. अहवाल व बटाटा अधिक तपासणीसाठी कृषी संशोधन केंद्रात पाठविण्यात येणार आहे.- ए. जी. पाटीलविभागीय कृषी अधिकारी व तंत्रज्ञन