शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

नऊ उमेदवारांचे अर्ज मागे

By admin | Updated: October 1, 2014 01:11 IST

आज अंतिम दिवस : तीन वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येणार

सातारा : विधानसभा निवडणुकीत अर्ज मागे घेण्याच्या पहिल्या दिवशी आज, मंगळवारी एकूण नऊ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. उद्या, बुधवारी दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत असल्याची माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिली. दरम्यान, जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघांत किती उमेदवार उभे राहणार, हे उद्या दुपारी तीन वाजल्यानंतरच समजणार असून, यानंतरच अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठी सातारा जिल्ह्यातून आठ मतदारसंघांतून १७१ उमेदवारांनी २६० उमेदवारी अर्ज दाखल केले होते. सोमवारी झालेल्या छाननीदरम्यान ३२ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरल्यामुळे १६० उमेदवारांचे २२८ उमेदवारी अर्ज वैध ठरले. आज छाननीचा पहिला दिवस होता. फलटण विधानसभा मतदारसंघातून राजेशकुमार यादवराव तासगावकर, वाई मतदारसंघातून प्रदीप रामदास माने, माण मतदारसंघातून सोनिया जयकुमार गोरे, ‘कऱ्हाड उत्तर’मधून अशोक पांडुरंग पाटील, ‘कऱ्हाड दक्षिण’मधून सुरेश जयवंत भोसले, पाटण मतदारसंघातून सुभाष तानाजीराव देसाई, शंभूराज प्रकाश देसाई, शिवाजी गोविंद नांगरे, तर सातारा विधानसभा मतदार संघातून वेदांतिकाराजे शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आपले अर्ज मागे घेतले.दरम्यान, उद्या दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत असल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली. (प्रतिनिधी)