शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पुढील हंगामात चार चिमण्या पेटण्याची शाश्वती

By admin | Updated: February 27, 2015 00:20 IST

फलटण तालुक्यात : ऊस उत्पादकांना दिलासा मिळणार

आदर्की : फलटण तालुक्याचा पूर्व भाग स्वतंत्रपूर्ण काळात नीरा उजव्या कालव्यामुळे बागायती झाला. तर दक्षिण व पश्चिम भाग स्वातंत्र्याच्या ६५ वर्षांनंतर बागायती होऊ लागल्यामुळे औद्योगिक वसाहतीबरोबर न्यू शुगर वर्क्स व श्रीराम साखर कारखाने आहेत. लोकनेते हिंदुराव निंबाळकर साखर कारखाना पूर्णत्वाकडे आहे. कापशी येथील लोकमान्य साखर कारखाना उभारणीचे काम युद्ध पातळीवर सुरू असल्याचे पुढील हंगामात चार चिमण्या पेटणार असल्याने ऊस उत्पादकांना दिलासा मिळणार असल्याचे दिसत आहे.फलटण तालुका कायम दुष्काळी असताना फलटणचे मालोजीराजे नाईक-निंबाळकर यांनी नीरा उजव्या कालव्यासाठी प्रयत्न करून पूर्व भाग बागायती केल्याने नगदी पिकाबरोबर उसाचे क्षेत्र वाढू लागल्याने फलटण येथे श्रीराम साखर कारखाना सहकारी तत्त्वावर उभारला. त्याबरोबर न्यू शुगर वर्क्स साखरवाडी येथे त्यांनी त्यावेळी सहकार्यातून खासगी कारखाना आपटे उद्योग समूहाने उभा केला.त्यामुळे गुळाची गुऱ्हाळे ही मोठ्या प्रमाणात होती. त्यामुळे उसाचे गाळप होत होते; परंतु दुष्काळी भागात जलसंधारणाची कामे होऊन छोटी-मोठी धरणे बांधल्याने पाणीसाठा होऊ लागल्यामुळे बागायती क्षेत्रात वाढ होऊन उसाचे क्षेत्र वाढले. त्यामुळे कारखाना पूर्ण क्षमतेने चालवूनही ऊस शिल्लक राहू लागला. त्यानंतर श्रीराम साखर कारखाना आजारी पडल्याने न्यू शुगर वर्क्सवर ऊस गाळपाची क्षमता कमी असल्याने शेजारचे साखर कारखाने ऊस नेत असत. दराची शाश्वती नसायची नंतर श्रीराम साखर कारखाना जवाहर उद्योग करार तत्त्वावर दिल्याने उसाचे गाळप होऊ लागले. परंतु दुष्काळी भागात धोम-बलकवडीचे पाणी बाणगंगेपर्यंत पोहोचल्याने उसाचे क्षेत्र वाढले. त्याबरोबर न्यू शुगर वर्क्सने प्रल्हादराव साळुंखे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याची गाळप क्षमता वाढवली आहे. परंतु श्रीराम कारखान्याची यंत्रणा कासव गतीने सुरू असल्याचे उसाला तुरे आले आहेत. धोम-बलकवडीचे पाणी वेळेत दुष्काळी भागात येत असल्यामुळे उसाची लागण मोठ्या प्रमाणात झाली आहे.स्वराज्य इंडियाचे संचालक रणजित निंबाळकर यांनी सीतामाईच्या पायथ्याला माण फलटणचे उसाचे कार्यक्षेत्र लक्षात घेऊन उपळवे येथे लोकनेते हिंदुराव नाईक- निंबाळकर यांनी सीतामाईच्या पायथ्याला माण-फलटणचे उसाचे कार्यक्षेत्र लक्षात घेऊन उपळवे येथे लोकनेते हिंदुराव नाईक-निंबाळकर साखर कारखान्याची वर्षात उभारणी करून गत महिन्यांत कारखान्याचे बॉयलर पेटवले. चांगला हंगाम घेण्याचा ही त्यांचा मानस आहे. कापशीच्या माळावर लोकमान्य साखर कारखान्याचे भूमिपूजन झाले. काम युद्धपातळीवर सुरू असल्याने फलटण तालुक्यात पुढील हंगामात चार चिमण्या पेटणार असल्याचे ऊस उत्पादकांना दिलासा मिळणार आहे. (प्रतिनिधी)