शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नववर्षाची पहाट कोठडीत उजाडू नये!

By admin | Updated: December 30, 2015 00:46 IST

पोलिसांची ‘फिल्डिंग’: कास, ठोसेघर रस्त्यांवर नाकाबंदी; दारू सापडल्यास कठोर कारवाई

सातारा : नववर्षाची पहाट ‘लॉकअप’मध्ये उजाडू नये असे वाटत असेल तर ‘हौशी’ तरुणांनी विनापरवाना दारू बाळगणे आणि प्राशन करणे टाळावे, असा सल्ला पोलिसांनी दिला आहे. निसर्गाच्या सान्निध्यात धिंगाणा आणि मद्यपान करून वाहन चालविण्याचे घातक प्रकार रोखण्यासाठी पोलिसांकडून बुधवारी कास आणि ठोसेघर रस्त्यावर नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करण्यात येणार आहे.मद्यपान करून वाहन चालविताना आढळल्यास संबंधिताला अटक करण्याचे अधिकार पोलिसांना असून, मोटार वाहन कायद्याच्या कलम १८५ नुसार गुन्हा दाखल होऊ शकतो. या गुन्ह्यात जामीन देण्याचे अधिकार पोलिसांना नाहीत; त्यामुळे दुसऱ्या दिवशी न्यायालयात हजर केल्यावरच जामिनावर विचार होऊ शकतो. परिणामी, रात्र कोठडीत व्यतीत करावी लागू शकते आणि नववर्षाची पहाट तेथेच पाहावी लागू शकते, अशी माहिती पोलिसांनी दिली.हौशी मंडळी निसर्गाच्या सान्निध्यात नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मोठ्या संख्येने जातात. साताऱ्याजवळील यवतेश्वर, कास परिसर तसेच ठोसेघर रस्त्यावरील अनेक ठिकाणे युवकांना भुरळ घालतात. तथापि, परवान्याशिवाय मद्यसाठा वाहनात आढळल्यास पोलीस तातडीने संबंधिताला ताब्यात घेणार आहेत. विक्रीसाठी मद्य बाळगणाऱ्यावर कारवाई करण्यात येणार आहे. अवघड, अरुंद रस्ते असलेल्या भागात मद्य सोबत घेऊन जाऊ नये आणि त्यातून धोका निर्माण होऊ नये, यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे. (प्रतिनिधी)कास वनसमितीही सज्जवनविभागाच्या हद्दीत धिंगाणा करणे, वन्यजीवांना अडथळा येईल असे वर्तन करणे अशा बाबींवर वनविभागाचे अधिकारी लक्ष ठेवून असतील. अशा व्यक्तींविरुद्ध वन अधिनियमाच्या उल्लंघनाचा गुन्हा दाखल होऊ शकतो. विशेषत: कास परिसरात हे पथ्य पाळावे, अशी अपेक्षा संयुक्त वनव्यवस्थापन समितीने व्यक्त केली आहे. वणवे लावण्यासारखे प्रकार आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा समितीतर्फे विष्णू किर्दत यांनी दिला आहे.नववर्षाच्या स्वागताचा जल्लोष जरूर असावा; परंतु कोणालाही त्रास होईल असे वर्तन करू नये. मद्यपानाचा परवाना असला तरी ते बाळगण्याचा परवाना नसल्यास बाळगणाऱ्याला रात्र कोठडीत काढावी लागेल. कास, ठोसेघर रस्त्यांबरोबरच कण्हेर आणि उरमोडी धरण परिसरातही तपासणी करण्यात येणार आहे.- दत्तात्रय नाळे, पोलीस निरीक्षक, सातारा तालुका