शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गणेवाडीच्या प्रियंकाला मिळणार नवी दृष्टी... गुड न्यूज-शिक्षकाची माणुसकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 00:08 IST

मल्हारपेठ : गणेवाडी-ठोमसे, ता. पाटण येथील जिल्हा परिषद शाळेचे उपशिक्षक अमोल हजारे यांच्या प्रयत्नामुळे पहिल्या इयत्तेत शिक्षण घेणाऱ्या प्रियंकाला नवीन दृष्टी

ठळक मुद्देपुणे येथे होणार शस्त्रक्रिया; शिबिरात झाली तपासणी

सुनील साळुंखे ।मल्हारपेठ : गणेवाडी-ठोमसे, ता. पाटण येथील जिल्हा परिषद शाळेचे उपशिक्षक अमोल हजारे यांच्या प्रयत्नामुळे पहिल्या इयत्तेत शिक्षण घेणाऱ्या प्रियंकाला नवीन दृष्टी मिळणार आहे.सामाजिक कार्याची आवड असणाºया गणेवाडी शाळेचे उपशिक्षक अमोल हजारे यांनी मानव विकास संस्था, युवा मोरया सामाजिक संस्था, संजीवन सामाजिक संस्था, बुद्र्राणी हॉस्पिटल व आर्ट आॅफ लिव्हिंग यांच्या संयुक्त विद्यमाने ठोमसे ग्रामपंचायतीत मोफत नेत्रदान शिबिर आयोजित केले होते. शिबिरात ठोमसे, मोरेवाडी, तांबेवाडी, गणेवाडीतील संपूर्ण विद्यार्थ्यांसह दोनशे ग्रामस्थांनी मोफत नेत्र तपासणी केली तर ७० ग्रामस्थांनी चष्म्याचा लाभ घेतला.यावेळी पहिल्या इयत्तेत शिकणारी विद्यार्थिनी प्रियंका विठ्ठल माने हिच्या डोळ्यातून जन्मापासून पाणी येत असल्यामुळे तिची नजर कमी कमी होत असल्याचे तपासणी करताना लक्षात आले. यावेळी बुद्र्राणी हॉस्पिटलचे डॉक्टर यांनी सांगितले की, प्रियंकाचे आॅपरेशन केले तरच तिचे डोळे वाचू शकतात, अन्यथा तिला कायमचे अंधत्व येऊ शकते. यावेळी मानव विकास संस्था, सातारा येथील युवा मोरया सामाजिक संस्थेने प्रियंकाला डोळ्याच्या आॅपरेशनच्या संपूर्ण खर्चाची तयारी दर्शविली आहे.प्रियंकाचे वडील विठ्ठल माने हे दुकानात हमाली करत असून, आई संगीता ही मोलमजुरी करून कुटुंब चालवत आहे. घरची परिस्थिती बेताची असल्याने जन्मापासून मुलीच्या डोळ्यातून पाणी येत असूनही कुटुंबीय तिच्यावर उपचार करू शकले नाहीत. मात्र देवदुताप्रमाणे उपशिक्षक हजारे यांनी मोफत नेत्रतापसणी शिबिर घेऊन प्रियंकाला नवीन दृष्टी दिल्यामुळे ठोमसे, उरूल भागातील ग्रामस्थांतून समाधान व्यक्त होत आहे. प्रियंका पहिलीत शिकत असून, हुशार व चाणाक्ष आहे.उपचारासाठी मदतीचे आवाहनप्रियंकाची आई संगीता व चार वर्षांचा लहान भाऊ ओंकार यांच्या डोळ्यातूनही पाणी येत आहे. हा अनुवांशिक आजार असून, आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे त्यांच्यावर उपचार होणे आवश्यक आहे. यासाठी कोणत्या तरी दानशूर व्यक्तींनी समोर येऊन प्रियंकाची आई व लहान भाऊ ओंकार यांच्या डोळ्यावर उपचार करून नवीन दृष्टी देण्याची मागणी ठोमसे ग्रामस्थांच्यातून होत आहे.प्रियंकासारख्या गरजू व गरीब कुटुंबांतील लोकांना मोफत नेत्र तपासणी शिबिराचा लाभ होऊन डोळ्यांच्या व्याधीपासून मुक्ती व्हावी, हा आपला उद्देश आहे. उरूल, मल्हारपेठ परिसरातील अशा प्रियंकांचा शोध घेण्यासाठी विविध वाडी वस्तीवर शिबिरे घेऊन लोकांची सेवा करणार आहे.- अमोल हजारे, उपशिक्षक,गणेवाडी जिल्हा परिषद शाळा