शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

कचऱ्यातल्या आयुष्याला मिळाली नवी ओळख...

By admin | Updated: April 22, 2016 01:02 IST

सयाजी शिंदे म्हणतात... डोक्यातला कचरा रस्त्यावर येतो! गुड न्यूज

सातारा : कचरा वेचणाऱ्यांना ‘कचरावेचक’ न म्हणता ‘स्वच्छतादूत’ म्हणावे, असे आवाहन अभिनेते सयाजी शिंदे यांनी केले. ‘कचरा डोक्यात असतो; मग तो रस्त्यावर येतो,’ अशा शब्दांत त्यांनी रस्त्यावर कचरा फेकणाऱ्यांना फटकारले.सर्व कचरा वेचक श्रमिक संघाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात स्वच्छतादूतांना आस्था सामाजिक संस्थेच्या वतीने सयाजी शिंदे यांच्या हस्ते गणवेश वाटप करण्यात आले. आस्था सामाजिक संस्थेचे विजयकुमार निंबाळकर यावेळी उपस्थित होते.स्वच्छतादूतांना व्यसनांपासून दूर राहण्याचा संदेश देऊन सयाजी शिंदे म्हणाले, ‘या दूतांना गणवेश वाटप करताना मला आनंद होत आहे. आरोग्य, स्वच्छता आणि मुलांचे शिक्षण या तीन गोष्टींना आयुष्यात महत्त्व देणे आवश्यक आहे. ज्या गोष्टींना महत्त्व द्यायला हवे त्या उपेक्षित राहणे योग्य नव्हे.’स्वच्छतादूतांना ओळखपत्रे देऊन त्यांची शहरातील विविध प्रभागांत नेमणूक झाली तर घनकचऱ्याचे नियोजन करण्यास मोठा हातभार लागेल, असे शिंदे यांनी सांगितले. यावेळी शिवाजी पवार, विजय मांडके, सचिन चंदने, जयंत ठाकूर, प्रेमराज शिंदे, मिनाज सय्यद, स्वप्नील ढाणे, सुनील उबाळे, सुनील भोसले, मंगेश लावंड, जनार्दन निपाणे, अमित तपासे, विनय रावखंडे, आस्था सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. सर्व कचरावेचक श्रमिक संघाचे आशिष सोनावणे यांनी सूत्रसंचालन केले. प्रकाश भिसे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)