शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
2
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
3
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
4
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
5
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
6
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
7
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
8
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
9
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
10
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
11
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
12
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
13
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
14
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
15
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
16
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
17
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
19
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
20
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा

ॲनिमेशन, गेमिंगमध्ये मिळणार उद्योगाच्या नव्या वाटा; एव्हीजीसी-एक्सआर धोरणामुळे सातारासह अन्य जिल्ह्यांना संधी

By दीपक देशमुख | Updated: September 18, 2025 17:46 IST

पहिल्या पाच वर्षांसाठी ३०८ कोटी

दीपक देशमुखसातारा : राज्य मंत्रिमंडळाने १६ रोजी ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स आणि एक्सटेंडेड रिॲलिटी धोरणाला मंजुरी दिली आहे. यामुळे साताऱ्यासह राज्यातील विविध शहरांना नव्या संधी उपलब्ध होणार आहेत.राज्य शासनाच्या धोरणानुसार अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित पायाभूत सुविधा उभारल्या जाणार असून, स्थानिक युवकांसाठी रोजगार व उद्योजकतेचे दरवाजे खुले होणार आहेत. या धोरणाचा जिल्ह्याला लाभ होण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करण्याची गरज आहे.

उद्योग क्षेत्राला नवा दर्जा

  • राज्य शासनाने एव्हीजीसी-एक्सआर क्षेत्राला उद्योग आणि पायाभूत सुविधा क्षेत्राचा दर्जा दिला आहे.
  • २०५० पर्यंतच्या नियोजनासह ३२६८ कोटींचा आराखडा तयार केला आहे.
  • पुढील २० वर्षांत सुमारे ५० हजार कोटींची गुंतवणूक अपेक्षित आहे.
  • या माध्यमातून २ लाख रोजगार निर्माण होणार आहेत.

सातारा व अन्य शहरांचा समावेशसध्या राज्यात सुमारे २९५ एव्हीजीसी स्टुडिओ कार्यरत आहेत. याशिवाय मुंबई फिल्म सिटी, नवी मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, नागपूरसोबतच सातारा येथे एव्हीजीसी-एक्सआर पार्क विकसित होणार आहेत.या पार्कमध्ये हाय-स्पीड डिजिटल कनेक्टिव्हिटी, मोशन कॅप्चर स्टुडिओ, पोस्ट-प्रोडक्शन लॅब, हाय-परफॉर्मन्स रेंडरिंग फर्म, साउंड रेकॉर्डिंग सुविधा आणि व्हर्चुअल प्रोडक्शन स्टुडिओ उपलब्ध राहणार. एआय आधारित ॲनिमेशन, रिअल-टाइम रेंडरिंग, इमर्सिव्ह अनुभव आणि मेटाव्हर्स उपाययोजनांची सुविधा दिली जाणार.

पहिल्या पाच वर्षांसाठी ३०८ कोटीयोजनेत पहिल्या पाच वर्षांसाठी ३०८ कोटी आणि पुढील वीस वर्षांसाठी २,९६० कोटी, असा एकूण ३,२६८ कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. या आर्थिक वर्षासाठी २०२५-२६ साठी अतिरिक्त १०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. सहभाग निधी म्हणून २०० कोटींची, तर स्थानिक उद्योजकांच्या स्टार्टअपसाठी ३०० कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.

साताऱ्यात उभारण्यात येणाऱ्या एव्हीजीसी-एक्सआर पार्कमुळे स्थानिक युवकांसाठी रोजगार, प्रशिक्षण आणि स्टार्टअपची दालने उघडणार आहेत. शासनाने केलेल्या मोठ्या निधी तरतुदीमुळे सातारा जिल्हा राज्याच्या उदयोन्मुख डिजिटल मनोरंजन उद्योगाचा एक महत्त्वाचा केंद्रबिंदू ठरेल. या माध्यमातून स्थानिक प्रतिभेला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःला सिद्ध करण्याची उत्तम संधी मिळणार आहे. ही सुवर्णसंधी पदरात पाडून घेण्यासाठी आक्रमक पावले उचलण्याची आवश्यकता आहे. - अवधूत निकम, आयटी अभियंता, सातारा