शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

‘किसन वीर’चा नवा मापदंड

By admin | Updated: May 23, 2015 00:36 IST

अध्यक्षपदी मदन भोसले: उपाध्यक्षपदी गजानन बाबर यांची निवड

भुर्इंज : ‘भुर्इंज, ता. वाई येथील किसन वीर सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे मदन भोसले आणि उपाध्यक्षपदी गजानन बाबर यांची तिसऱ्यांदा फेरनिवड झाली. दरम्यान, मदन भोसले यांनी सभासदांनी ज्या विश्वासाने कारखान्याची सत्ता पुन्हा आमच्या ताब्यात दिली, त्या विश्वासाला तडा जाऊ न देता किसन वीर उद्योग समूहाचा राज्यातील साखर उद्योगात नवा मापदंड निर्माण करू,’ अशी ग्वाही दिली.अध्यासी अधिकारी तथा प्रांताधिकारी रवींद्र खेबुडकर यांच्या अध्यक्षतेखाली कारखान्याच्या सभागृहात नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या बैठकीत मदन भोसले यांचा अध्यक्षपदासाठी व गजानन बाबर यांचा उपाध्यक्षपदासाठी एकमेव अर्ज दाखल झाला. त्यामुळे या निवडी बिनविरोध झाल्याचे खेबुडकर यांनी सांगितले. अध्यक्षपदासाठी मदन भोसले यांचे नाव सीए सी. व्ही. काळे यांनी सुचविले त्यास चंद्रकांत इंगवले यांनी अनुमोदन दिले, तर उपाध्यक्षपदासाठी गजानन बाबर यांचे नाव रतनसिंह शिंदे यांनी सुचविले त्यास नंदकुमार निकम यांनी अनुमोदन दिले. नूतन अध्यक्ष, उपाध्यक्षांचा अध्यासी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी सत्कार केला.किसन वीर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सत्ताधारी मदन भोसले यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास पॅनेलने चोवीस ते पंचवीस हजार मतांच्या फरकाने २१-० असा दणदणीत विजय मिळवून विजयाची हॅटट्रिक केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसने या निवडणुकीतून माघार घेतल्यामुळे या कारखान्याची निवडणूक बिनविरोध होईल, असे वाटत असताना शिवसेनेच्या अट्टाहासामुळे सभासदांवर ही निवडणूक लादली गेली होती. राज्याचे लक्ष लागलेली किसन वीर कारखान्याची ही निवडणूक मदन भोसले यांनी एकहाती जिंकून शिवसेनेला सणसणीत चपराक दिलेली होती. सर्व विरोधी उमेदवारांचे डिपॉझिटही या निवडणुकीत जप्त झाले होते. मदन भोसले म्हणाले, ‘गेल्या बारा वर्षांत सर्वसामान्य ऊस उत्पादक सभासद व कारखान्याचा कामगार केंद्रबिंंदू मानून कारभार केला. शेतकऱ्यांच्या घामाला योग्य दाम देताना भविष्याचा वेध घेऊन साखर उत्पादनाशिवाय सभासद हिताचे अनेक उपक्रमपूरक उद्योग उभे केले. राज्यात किसन वीर कारखाना नावारूपाला आणला. दरम्यान, या बैठकीस कारखान्याचे नवनिर्वाचित संचालक मदन भोसले, गजानन बाबर, संचालक सीए सी. व्ही. काळे, चंद्रकांत इंगवले, रतनसिंह शिंदे, नंदकुमार निकम, सचिन साळुंखे, नवनाथ केंजळे, राहुल घाडगे, प्रवीण जगताप, प्रताप यादव, मधुकर शिंदे, सयाजी पिसाळ, चंद्रसेन शिंदे, प्रकाश पवार, मधुकर नलवडे, विजय चव्हाण, अरविंद कोरडे, भगवानराव आवडे, विजया साबळे, आशा फाळके उपस्थित होते. (वार्ताहर) नव्या कारभाराचा वृक्षारोपणाने प्रारंभ...नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या विशेष बैठकीत अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर मदन भोसले, उपाध्यक्ष गजानन बाबर व संचालक मंडळाने शेततळ्यांच्या परिसरात उपस्थित मान्यवर व कार्यकर्त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करून नव्या कारभाराचा प्रारंभ केला. कारखान्याच्या आजपर्यंतच्या विकासात वृक्षलागवडीतून खडकाळ माळरानाचे नंदनवन करताना मदन भोसले यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाने वृक्षलागवड आणि पर्यावरण संवर्धनालाही तितकेच महत्त्व दिले आहे. २१ जानेवारी २००३ रोजी बदामबनापासून वृक्षलागवडीला सुरुवात होऊन बारा वर्षांत सुमारे २५ हजार फळ-फुले, झाडे लावून कारखाना परिसर हिरवागार केलेला आहे. सभासदाभिमुख कारभारसभासदांनी तिसऱ्यांदा दिलेल्या संधीचा योग्य वापर करून सहकारी संचालकांच्या सहकार्य व परस्पर सुसंवादातून यशवंतराव चव्हाण व कारखान्याचे संस्थापक आबासाहेब वीर यांना अभिप्रेत असलेला सभासदाभिमुख कारभार करण्याबरोबरच गतिमान विकासाची प्रक्रिया अखंडपणे सुरू ठेवली जाईल.