शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

नगराध्यक्षांच्या दिमतीला पालिकेची नवीकोरी गाडी

By admin | Updated: October 21, 2015 21:44 IST

प्रतीक्षा संपली : चार महिन्यांनंतर पालिकेत गाडीचे आगमन

कऱ्हाड : येथील कऱ्हाड नगरपालिकेच्या नगराध्यक्षांच्या गाडीला चार महिन्यांनंतर मुहूर्त मिळाला. चार महिन्यांपासून खासगी गाडीने प्रवास करणाऱ्या पालिकेच्या नगराध्यक्षा अ‍ॅड. विद्याराणी साळुंखे यांच्या सेवेसाठी पालिकेची नवीन गाडी प्राप्त झाली. चार महिन्यांनंतर अखेर नगराध्यक्षांना नवी कोरी गाडी मिळाली.दि. १६ जूनला कऱ्हाड पालिका नगराध्यक्षांच्या जुन्या गाडीचा लिलाव झाल्यापासून मंजुरीच्या लालफितीत अडकलेल्या नवीन गाडीचे सोमवारी चार महिन्यांनंतर पालिकेत आगमन झाले. मंगळवारी पालिकेच्या विशेष सभेला नगराध्यक्षा अ‍ॅड. विद्याराणी साळुंखे नवीन गाडीतून आल्या.येथील पालिकेच्या नगराध्यक्षांसाठी २००६ मध्ये अ‍ॅम्बेसिडर खरेदी करण्यात आली होती. पेट्रोल वाहन व सातत्याने होणाऱ्या बिघाडामुळे ते विकण्याचा निर्णय पालिकेने घेतला. त्यानुसार तसा गाडीच्या लिलावाचा ठरावही करण्यात येऊन गेल्या नोव्हेंबरपासून नवीन वाहन खरेदीच्या प्रस्तावाची प्रक्रिया सुरू झाली. मात्र, जुन्या वाहनाचा लिलाव झाल्याशिवाय नवीन वाहन घेता येणार नसल्याचे वरिष्ठ कार्यालयाच्या सूचनेनुसार जुन्या गाडीचा लिलाव करण्यात आला. नगराध्यक्षांच्या जुन्या गाडीचे येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडून सुमारे सत्तर हजारांचे मूल्यांकन करण्यात आले. त्यानुसार लिलावप्रक्रिया बोलाविण्यात आली. मात्र, गाडीची किंमत जास्त असल्याने खरेदीदारांनी लिलावप्रक्रियेकडे पाठ फिरविली. दोनवेळा लिलाव घेण्यात आल्यानंतरही गाडीला कोणीच बोली लावली नसल्याने अखेर तिसऱ्या लिलावावेळी गाडीचे फेर मूल्यांकन ४३ हजारांवर करण्यात आले. त्यानंतर बोलाविलेल्या लिलावप्रक्रियेस खरेदीदारांचा प्रतिसाद मिळाला. त्यावेळी निर्माण झालेल्या बोलीच्या चढाओढीत जुन्या गाडीची एक लाख ७० हजारांला विक्री करण्यात आली. त्यामुळे पालिकेला अपेक्षेपेक्षा अधिक रक्कम बोलीतून प्राप्त झाली.नगराध्यक्षांच्या गाडी खरेदीला जिल्हाधिकारी यांनी अंतिम मंजुरी दिल्यानंतर अखेर सातारा येथून मंगळवारी कऱ्हाडच्या नगराध्यक्षांसाठी नवीन कार खरेदी करण्यात आली. व ती कऱ्हाड येथे आणण्यात आली. तब्बल चार महिने नगराध्यक्षांना खासगी गाडीने प्रवास करावा लागला. आता नवी गाडी उपलब्ध झाल्याने त्यांची या त्रासापासून सुटका झाली आहे. (प्रतिनिधी)नवीन गाडीची किंमत साडेसात लाख कऱ्हाड पालिकेच्या नगराध्यक्षा अ‍ॅड. विद्याराणी साळुंखे यांच्या वापरासाठी पालिकेने अखेर चार महिन्यांनंतर नवीन पांढऱ्या रंगाची गाडी तब्बल साडेसात लाखांना खरेदी केली आहे. त्यामुळे पूर्वीच्या गाडीनंतर आता नवीन गाडीतून नगराध्यक्षा प्रवास करणार आहेत. त्रासापासून सुटकानगराध्यक्षांची खासगी गाडीने प्रवास करण्याच्या त्रासापासून सुटका झाली असून, आता पालिकेच्या नवीन गाडीतून नगराध्यक्षांना दिमाखदारपणे प्रवास करता येणार आहे.