शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शेजाऱ्यानेच घेतला गायत्रीचा बळी

By admin | Updated: December 26, 2014 00:12 IST

गूढ उकलले : मंडप कामगाराच्या क्रौर्याचा पर्दाफाश

खंडाळा : सहावर्षीय गायत्री जमदाडे हिच्या खुनाचा पर्दाफाश करण्यात खंडाळा पोलिसांना यश आले आहे. शेजाऱ्याकडे खेळण्यासाठी गेलेल्या गायत्रीला शेजाऱ्यानेच डोक्यात जोरदार फटका मारल्याने तिचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले असून, पोलिसांना गुंगारा देण्याचे आरोपीचे सर्व प्रयत्न फोल ठरवत पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.आरोपीने तपासात गुन्ह्याची कबुली दिली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली. ज्ञानेश्वर विलास धायगुडे ऊर्फ नोन्या असे आरोपीचे नाव असून, तो मंडपाच्या कामावर कामगार आहे. अहिरे (ता. खंडाळा) येथून गायत्री जमदाडे ही सहा वर्षांची मुलगी बेपत्ता झाली होती. तीन दिवसांनी तिचा छिन्नविच्छिन्न मृतदेह नीरा उजवा कालव्यात आढळला होता. खुनाची शक्यता गृहीत धरून पोलिसांनी तपासचक्रे फिरविली असता, आरोपीच्या भयानक कृत्याचा पर्दाफाश झाला.रविवारी (दि. १४) आजी रानात गेल्याने गायत्री आरोपी धायगुडेच्या घराच्या परिसरात खेळायला गेली होती; पण आरोपीने रागाच्या भरात गायत्रीच्या डोक्यात जोरात फटका मारला आणि गायत्री बेशुद्ध पडली. थोड्या वेळाने गायत्री मरण पावल्याचे त्याच्या लक्षात येताच आरोपीने मंडपाचे साहित्य भरण्याच्या पोत्यात गायत्रीचा मृतदेह भरला आणि ते शेजारच्या वापरात नसलेल्या घराच्या न्हाणीघरात ठेवले. कुणाच्या लक्षात येऊ नये म्हणून पोत्यावर दगड ठेवला. दुसऱ्या दिवशी मंडपाचा काथ्या त्याच पोत्यात भरला आणि मृतदेहासह ते पोते गाडीवर घेऊन त्याने नीरा उजवा कालव्यात टाकून दिले. गुन्ह्याचा कसलाही मागमूस त्याने ठेवला नव्हता; मात्र पोलिसांनी गुन्ह्याचा छडा लावलाच. पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल माकणीकर, पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांच्यासह कर्मचाऱ्यांनी गुन्ह्याचा छडा लावला. (प्रतिनिधी)गुन्हेगारी पार्श्वभूमीगायत्रीला एवढ्या जोरात फटका मारण्यामागे आरोपीच्या मनात कोणता राग होता, याबाबत पोलीस साशंक असून, कारणाचा शोध सुरू आहे. दरम्यान, आरोपी नोन्याची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची असून, चोरी, मारामारी यासारख्या गुन्ह्यात तो पोलिसांच्या रडारवर होता.