शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

नीरा-देवघरच्या पाण्यामुळे ओढे खळाळले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 23:43 IST

लोकमत न्यूज नेटवर्कखंडाळा : नीरा-देवघर धरणाचे पाणी या प्रकल्पाच्या सिंचन क्षेत्रामध्ये असणाºया खंडाळा तालुक्यातील गावांना पोहोचल्याने खरीपहंगाम वाचला आहे. नीरा-देवघरच्या पाण्याने शिवार पुन्हाएकदा फुलल्याचे पाहायला मिळत आहे. तालुक्यातील ओढ्यांना पाणी वाहू लागले आहे.या वर्षी पावसाने चांगलीच हुलकावणी दिली असल्याने वाघोशी, अंदोरी, कराडवाडी, मोर्वे आदी गावांमध्ये व परिसरांत पिण्याचा व शेती ...

लोकमत न्यूज नेटवर्कखंडाळा : नीरा-देवघर धरणाचे पाणी या प्रकल्पाच्या सिंचन क्षेत्रामध्ये असणाºया खंडाळा तालुक्यातील गावांना पोहोचल्याने खरीपहंगाम वाचला आहे. नीरा-देवघरच्या पाण्याने शिवार पुन्हाएकदा फुलल्याचे पाहायला मिळत आहे. तालुक्यातील ओढ्यांना पाणी वाहू लागले आहे.या वर्षी पावसाने चांगलीच हुलकावणी दिली असल्याने वाघोशी, अंदोरी, कराडवाडी, मोर्वे आदी गावांमध्ये व परिसरांत पिण्याचा व शेती पाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता, या भागातील बाजरीचे पीक देखील पाण्याअभावी वाळू लागले होते. त्यामुळे मोर्वेयेथील कालव्यावरील पुलाचे अर्धवट काम पूर्ण करून नीरा-देवघर धरणातील पाणी उजव्या कालव्यातून खंडाळा तालुक्यापर्यंत सोडण्यात आले असून, हे पाणी अंदोरी गावापर्यंत पोहोचले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात हे पाणी तब्बल १७वर्षांनी अंदोरीच्या शिवारात खळाळत आहे.खंडाळा तालुक्यापर्यंत नीरा-देवघरचे पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी खंडाळा विकास प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आलेली होती,या मागणीनुसार नीरा-देवघर प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता शिवाजी बोलभट यांनी १५ आॅगस्टपासून पाणी सोडण्याचे नियोजन केले होते.त्यातच नीरा-देवघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने धरणात मोठा पाणी साठा झाला आहे. त्याबरोबर नीरा-देवघर, भाटघर या धरणामधून मोठ्या प्रमाणावर पाणी वीर धरणात सोडण्यात आल्याने धरण भरले आहे. त्यामुळे वीर धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात येत आहे, खंडाळा तालुक्यातही पाऊस नसल्याने नीरा-देवघरच्या उजव्या कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी जोर धरू लागल्याने नीरा-देवघर धरणाच्या उजव्या कालव्यातून पाणीसोडण्यात आले असल्याने आता खंडाळा तालुक्यातील वाघोशी, अंदोरी, कराडवाडी, मोर्वे, लोणी, तोंडल, शिवाजीनगर, भादवडे, शेखमिरवाडी, शिरवळ आदी गावांतील शेतकºयांना दुष्काळात दिलासा मिळणार आहे. पाण्याअभावी जळू लागलेल्या पिकांनादेखील जीवनदान मिळणार आहे. अंदोरी मध्ये पाणी दाखल झाल्यावर नीरामाईचे हे पाणी पाहण्यासाठी अंदोरीकरांनी मोठी गर्दी केली होती. पाणी सोडल्याने समाधान व्यक्त होत आहे.