शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

नीरा-देवघरचे पाणी मोर्वेत दाखल

By admin | Updated: February 26, 2017 00:32 IST

आनंदोत्सव साजरा : खंडाळा तालुक्यातील ग्रामस्थ, प्रकल्पग्रस्तांकडून पूजन

शिरवळ : चातकाप्रमाणे वाट पाहत बसलेल्या खंडाळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. कारण नीरा-देवघर प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेल्या आश्वासनाप्रमाणे मोर्वे गावापर्यंत पाणी पोहोचले आहे. हे पाणी पोहोचल्यानंतर मोर्वे ग्रामस्थ व प्रकल्पग्रस्तांच्या वतीने विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये जलपूजन करण्यात आले व आंनदोत्सवही साजरा केला. मोर्वे, ता. खंडाळा याठिकाणी मोर्वे व ११ गावांमधील ग्रामस्थ व प्रकल्पग्रस्तांच्या वतीने सरपंच मीनाक्षी धायगुडे, नंदकुमार धायगुडे, ग्रामस्थ यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. यावेळी नीरा-देवघरचे कार्यकारी अभियंता शिवाजी बोळभट, खंडाळा पाणी पंचायतीचे अध्यक्ष अ‍ॅड. बाळासाहेब बागवान, माजी सभापती प्रा. एस. वाय. पवार, खंडाळा तालुका विकास प्रतिष्ठानचे सचिव डॉ. विजय शिंदे, काँग्रेसचे अजय धायगुडे, मानसिंग धायगुडे, पंडित जगताप, मल्हारी जगताप, धनाजी डेरे, भुजंग पवार, गोरख धायगुडे, आबासाहेब शेटे, शामराव धायगुडे आदी उपस्थित होते. याप्रसंगी ग्रामस्थ व प्रकल्पग्रस्तांना दिलेल्या आश्वासनाप्रमाणे नीरा-देवघरच्या कालव्याचे काम कोणत्याही परिस्थितीमध्ये पूर्ण करत मार्चअखेर वाघोशीपर्यंत पाणी प्रवाहित करण्यात येईल, असे आश्वासन नीरा-देवघरचे कार्यकारी अभियंता शिवाजी बोळभट यांनी दिले.याप्रसंगी अ‍ॅड. बाळासाहेब बागवान, डॉ. विजय शिंदे, प्रा. एस. वाय. पवार, नंदकुमार धायगुडे, मानसिंग धायगुडे, पंडित जगताप आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी डॉ. विजय शिंदे, नीरा-देवघर प्रकल्पाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांकडून करण्यात आला.शामराव धायगुडे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी) आंदोलनाचा इशारानीरा-देवघर कालव्याचे काम पूर्ण करुन पाणी वाघोशीपर्यंत सोडण्यासाठी ११ गावांच्या ग्रामस्थांनी निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला होता. तसेच प्रकल्पाच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशाराही दिला होता. त्यानंतर प्रशासनाने कालव्याचे काम पूर्ण करीत मोर्वेपर्यंत पाणी आणले आहे.