दहिवडी : नगरपंचायतीमध्ये आरोग्य सभापती व बांधकाम सभापती म्हणून उल्लेखनीय काम पाहिलेल्या नीलम शिवाजी शिंदे यांची गुरुवारी उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. या अगोदर सुप्रिया शिंदे या उपनगराध्यक्ष होत्या. त्यांनी पदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी, मुख्याधिकारी अवधूत कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक घेण्यात आली.
उपनगराध्यक्ष पदासाठी नीलम शिंदे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची निवड झाली. या निवडीवेळी नगराध्यक्ष धनाजी जाधव, माजी नगराध्यक्ष दिलीपराव जाधव, साधना गुंडगे, सतीश जाधव, नगरसेवक समीर योगे, लिंगराज साखरे, वैशाली कदम, ललिता जाधव, अर्चना खरात, सुप्रिया शिंदे, जयश्री कोकरे उपस्थित होत्या.
शिंदे या सुशिक्षित असून, त्यांनी अनेक कामे करून लोकांची मने जिंकली आहेत. त्यांच्या कामाची धडाडी पाहूनच त्यांना हे पद देण्यात आले. त्यांच्या या निवडीबद्दल आमदार जयकुमार गोरे, भास्करराव गुंडगे, सोनिया गोरे, माजी सभापती अतुल जाधव, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अर्जुन काळे, अरुण गोरे, अतुल शिंदे, सिद्धार्थ गुंडगे, महेश कदम, रमेश जाधव, मुराद शेख, रवींद्र सकुंडे, लालासो ढवाण, विजय खरात यांच्यासह तुपेवाडी ग्रामस्थांनी अभिनंदन केले.
११दहिवडी
फोटो-१) दहिवडीच्या उपनगराध्यक्षपदी नीलम शिंदे यांची निवड झाल्याबद्दल नगरसेवकांनी त्यांचे कौतुक केले.