शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
4
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
5
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
6
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
7
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
8
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
9
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
10
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
11
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
12
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
13
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
14
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
15
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
16
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
17
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का
18
भारताला रामराम? पुष्कर जोग झाला UAEचा 'गोल्डन व्हिसा'धारक, म्हणाला, "माझ्या मुलीच्या..."
19
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
20
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...

आत्मविश्वास वाढविणारी शिक्षणपद्धती आवश्यक

By admin | Updated: January 11, 2016 00:47 IST

शरद पवार : सांगलीत यंगमेन्स एज्युकेशन सोसायटी अमृतमहोत्सव सांगता समारंभात प्रतिपादन

सांगली : पारंपरिक शिक्षण पद्धतीबरोबरच नावीन्यपूर्ण उपक्रम स्वीकारायला हवेत. विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास वाढेल अशाप्रकारचे शिक्षण देण्यासाठी संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन माजी केंद्रीय कृषिमंत्री खासदार शरद पवार यांनी रविवारी सांगलीतील कार्यक्रमात केले. यंगमेन्स मॉडेल एज्युकेशन सोसायटीच्या अमृतमहोत्सवाचा सांगता सोहळ्यावेळी ते बोलत होते.पवार पुढे म्हणाले की, मातृभाषा विस्तार आणि प्रचार महत्त्वाचा असला तरी, जागतिक पातळीवरची भाषाही आता अवगत केली पाहिजे. मातृभाषेकडे दुर्लक्ष करा, असे मी म्हणत नाही. दोन्ही भाषांचे बोट धरून पुढे गेले पाहिजे. इंग्रजीबरोबरच फे्रंच, चायनिज अशा चार-पाच भाषा महत्त्वाच्या बनल्या आहेत. जागतिक पातळीवर जे बदल आता घडताहेत, ते स्वीकारण्याची वेळ आली आहे. त्यामुळे नवनव्या गोष्टींचा अंगिकार करण्याची तयारी केली पाहिजे. पोषक बदल स्वीकारण्याची मानसिकता तयार केली पाहिजे. बदलांबाबतचे औत्सुक्य तरुणांच्या मनात निर्माण होत आहे. त्यांच्यातील औत्सुक्याला बळ देण्याची गरज आहे स्त्री शिक्षणाविषयी ते म्हणाले की, ज्या देशांच्या प्रगतीत ५0 टक्के महिलांचा हातभार लागला, ते पाश्चिमात्य देशच आज पुढारलेले आहेत. संरक्षणमंत्री म्हणून मी काम करीत असताना हवाई दलात एकही महिला पायलट नव्हती. त्यावेळच्या हवाईदल प्रमुखांना वारंवार मी याचे कारण विचारत होतो. महिलांना हवाई दलात घेता येत नसल्याचे त्यावेळी त्यांनी स्पष्ट केले होते. शेवटी हवाई दलातील भरतीत १८ टक्के महिलांना आरक्षण देण्याचे आदेश मी दिले. प्रत्येकवर्षी यात १0 टक्के वाढीचाही निर्णय घेतला होता. हा निर्णय होण्यापूर्वी हवाई दलातील अपघातांचे प्रमाण अधिक होते. महिलांना हवाई दलात स्थान दिल्यानंतर बऱ्याच वर्षांनी मी हवाईदल प्रमुखांना सध्याच्या अपघातांचे प्रमाण विचारले. तेव्हा हे प्रमाण घटल्याचे दिसून आले. महिलांच्या हवाई दलातील सहभागामुळेच हा सकारात्मक परिणाम दिसून आला.यावेळी जयंत पाटील यांनीही मार्गदर्शन केले. संस्थेच्या अध्यक्षा मेघना कोरे यांनी प्रास्ताविक, तर बापूसाहेब पुजारी यांनी स्वागत केले. उपाध्यक्ष हणमंत पवार यांनी आभार मानले. यावेळी राजेंद्र यड्रावकर, उद्योजिका प्रभाताई कुलकर्णी, जयश्रीताई पाटील, लेफ्टनंट कर्नल हेमंत जोशी, सुलभाताई आरवाडे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)पवार म्हणतात : ते उद्योग आपले...महिलांचा सहभाग असलेल्या क्षेत्राची नेहमी प्रगती होते. याचे कारण म्हणजे महिलांची लक्ष केंद्रित करण्याची क्षमता पुरुषांपेक्षा अधिक असते. भाजी चिरण्यापासून, दूध तापविण्यापर्यंतच्या छोट्या-छोट्या गोष्टीतही त्यांचे लक्ष कधी दुसरीकडे जात नाही. काम सोडून दुसरीकडेच पाहत बसणे, हा उद्योग आम्हा पुरुषांचा आहे, असे मत शरद पवारांनी मांडले. त्यांच्या या वाक्यावर उपस्थितांत जोरदार हशा पिकला. प्रॉडक्ट चांगले हवेशाळा, महाविद्यालयांमधून बाहेर पडणारे प्रॉडक्ट चांगले हवे. सामाजिक बदलांना आणि त्यातील सर्व गोष्टींना सामोरे जाण्याची ताकद या पिढीमध्ये निर्माण व्हायला हवी. त्याची सर्वस्वी जबाबदारी शिक्षण संस्थांची आहे, असे मतही पवारांनी व्यक्त केले.