शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

विचारांसह बहुश्रुतपणाची गरज

By admin | Updated: September 18, 2015 23:23 IST

आनंद धामापूरकर : सावंतवाडीत बौद्ध सभेतर्फे कार्यकर्ता शिबिर

सावंतवाडी : सामाजिक, धार्मिक कार्य करताना नेहमीच तोंडात साखर व डोक्यात बर्फ ठेवावा लागतो. कार्यकर्त्यांकडे केवळ वक्तृत्व अथवा बुद्धी असून चालत नाही, तर चांगल्या विचाराला प्रचाराची जशी गरज असते, त्याचप्रमाणे बहुश्रुतपणाची गरज असल्याचे प्रतिपादन बौद्ध उपासक आनंद धामापूरकर यांनी गुरूवारी केले.भारतीय बौद्ध सभेच्यावतीने येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिरमध्ये कै. भैयासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आंबेडकर समाज मंदिरमध्ये कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुकाध्यक्ष बुधाजी कांबळी होते. यावेळी जिल्हाध्यक्ष सत्यवान जाधव, गोवा विभागाचे भीमराव चव्हाण, अर्जुन कोरगावकर, आदी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या प्रारंभी बुद्ध वंदना झाल्यानंतर आर. जी. चौकेकर यांनी स्वागत करून प्रास्ताविकातून कार्यकर्त्यांना प्रशिक्षणाची गरज का आहे, हे स्पष्ट केले. यावेळी जिल्हाध्यक्ष सत्यवान जाधव, गोव्याचे भीमराव चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. बुधाजी कांबळी यांनी आभार मानले. (वार्ताहर)आचरणातून ओळख पटवून द्या उपासक धामापूरकर यांनी बौद्ध महासभेची स्थापना, कामकाजाची पद्धत, कार्यकारिणी, इत्यादी माहिती सांगून कार्यकर्ता कसा असावा, हे स्पष्ट केले. कार्यकर्त्यांची जबाबदारी, भूमिका, संपर्क इत्यादीबाबत सविस्तर माहिती दिली. सध्याच्या जागतिकीकरणात, खासगीकरणात सुखशांतीसाठी धम्म महत्त्वाचा असल्याने प्रत्येकाने स्वत:च्या आचरणातून आपली ओळख इतरांना पटवून देण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन केले.