शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

कऱ्हाड उत्तर मतदारसंघात नवीन नेतृत्वाची गरज

By admin | Updated: December 25, 2015 00:01 IST

विलासराव पाटील-उंडाळकर : उंब्रजमधील कार्यक्रमात पाठीशी उभे राहण्याची ग्वाही

उंब्रज : ‘कऱ्हाड उत्तर मतदारसंघात संघर्षातून नेतृत्व पुढे आले तर ते आमदार बनू शकते. यासाठी मूळ कऱ्हाड उत्तर संघातील उंब्रज, मसूर, कोपर्डे, पाल, चरेगाव या गावांतून नेतृत्व उदयास येणे गरजेचे आहे. अशा नेतृत्वाच्या पाठीमागे मी खंबीरपणे उभा असेन,’ अशी ग्वाही माजी सहकारमंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांनी दिली.उंब्रज, ता. कऱ्हाड येथे कऱ्हाड तालुका खरेदीविक्री संघाचे उपाध्यक्ष महेश जाधव यांच्या निवासस्थानी ‘काका’ गटाला मानणाऱ्या नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्याच्या सत्कारावेळी ते बोलत होते. यावेळी वसंतराव जाधव हे अध्यक्षस्थानी होते. माजी उपसरपंच अशोक जाधव, ग्रामपंचायतीचे माजी सदस्य विजयराव कुरकुटे, विकास जाधव, विलास आटोळे, दिलीप जाधव यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.उंडाळकर म्हणाले, ‘लोकांच्यातून बुलंद आवाज आणि संघर्षातून नेतृत्व तयार होण्याची आवश्यकता आहे. हे नेतृत्व तयार करण्याची चळवळ तुम्हालाच करावी लागेल. ग्रामीण भागातून यापूर्वी जी ‘लिडरशीप’ तयार झाली होती. ती आज हयात नाही. राजकारणात कधीच ‘शॉर्टकट’ने सत्ता मिळत नाही. त्यासाठी संघर्ष करावा लागतो. लोकांना सर्व गोष्टी अनुकूल आहेत. आपले वैभव परत मिळविण्यासाठी प्रयत्न करा. कोणाचेही मांडलिक होऊ नका.’उंब्रज ग्रामपंचायतीच्या सात सदस्याचा सत्कार उंडाळकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी महेश जाधव, रवी गायकवाड, विकास जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी उंब्रजमधील व्यापारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे राहुल ढाणे यांनी प्रास्ताविक केले. विजय कुरकुटे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)वेट अ‍ॅण्ड वॉच...कऱ्हाड तालुक्यातील काँग्रेस पक्षाच्या संघटनाविषयी बोलताना उंडाळकर म्हणाले, ‘काही महिनेच ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’ करा. तुम्हाला संघटनेची ताकद समजेल. पक्षाचे कार्यकर्ते जागीच आहेत. ते कोठेही गेले नाहीत. या कार्यकर्ताची काय ताकद आहे, हे आगामी काळात दिसून येईल.कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना झाली नसती तर विलासराव पाटील-लंडाळकर यांना कोणीच निवडणुकीत पराभूत करू शकले नसते, असेही त्यांनी सांगितले. कऱ्हाड उत्तरमधून यापूर्वी सर्वसामान्य घरातील श्यामराव अष्टेकर यांच्यासारखा कार्यकर्ता दोनवेळा आमदार झाला होता. या मतदारसंघातील लोकांनी मनात आणले की येथे बदल होऊ शकतो, हे अष्टेकरांच्या माध्यमातून यापूर्वी समोर आले आहे.